ख्रिस गेलने निवडले 3 स्टार क्रिकेटपटू; फक्त 'या' भारतीयाला दिलं यादीत स्थान I Chris Gayle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chris Gayle

'युनिव्हर्स बॉस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलनं त्याच्या टॉप तीन आवडत्या T20 खेळाडूंची निवड केलीय.

Sports News : ख्रिस गेलने निवडले 3 स्टार क्रिकेटपटू

वेस्ट इंडिजचा (West Indies) बॅट्समन आणि 'युनिव्हर्स बॉस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलनं (Chris Gayle) त्याच्या टॉप तीन आवडत्या T20 खेळाडूंची निवड केलीय. या यादीची खास गोष्ट म्हणजे, यामध्ये गेलनं एका भारतीय फलंदाजाचीही निवड केलीय. आश्‍चर्याची बाब म्हणजे, स्वतः टी-20 क्रिकेटचा इतका महान आणि प्रभावशाली खेळाडू असूनही त्यानं त्याचं नाव या यादीत घेतलेलं नाही. तीन खेळाडूंच्या निवडीला उत्तर देताना गेलनं सर्वप्रथम वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनचं (Nicholas Pooran) नाव घेतलं. पूरन सध्या T20 क्रिकेटमधील सर्वात क्लीन स्ट्रायकर मानला जातो.

'ईएसपीएन क्रिकइन्फो'शी बोलताना गेलनं दुसऱ्या क्रमांकावर आपल्याच देशाच्या आंद्रे रसेलचं (Andre Russell) नाव घेतलंय. रसेल सध्याच्या काळातील सर्वात धोकादायक T20 खेळाडूंपैकी एक आहे. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) खेळतो. गेलनं भारताचा T20 कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) तिसरा आणि शेवटचा खेळाडू म्हणून घोषित केलंय. रोहित हा भारतातील सर्वात यशस्वी T20 खेळाडूंपैकी एक आहे आणि त्यानं या फॉरमॅटमध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) सर्वाधिक शतकं झळकावली आहेत.

हेही वाचा: लष्करी शस्त्रांत जगातील टॉप 100 मध्ये 3 भारतीय कंपन्यांचा समावेश

T20 क्रिकेटमधून ख्रिस गेल निरोप घेणार?

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं (West Indies Cricket Board) आपल्या दिग्गज फलंदाजाचा घरच्या प्रेक्षकांसमोर निरोप घेण्याचा निर्णय घेतलाय. बोर्डानं आयर्लंडसोबत (Ireland) तीन एकदिवसीय आणि एक T20 सामन्यांची मालिका ठेवलीय. आयरिश संघ जानेवारी 2022 मध्ये वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. जमैकाच्या सबिना पार्कमध्ये आयर्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय आणि दोन टी-20 सामन्यांच्या या दौऱ्याचं आयोजन केलं जाणार आहे. तर, आयर्लंडविरुद्धचा एकमेव टी-20 सामना गेलचा वेस्ट इंडिजसाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो, असं बोललं जात आहे.

Web Title: Cricket New Suniverse Boss Chris Gayle Selected His Top Three T20 Cricketers Rohit Sharma Name Also Included In The List

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..