Cricket News : जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामनापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढली

जयदेव उनाडकटनंतर आता केएल राहुलला दुखापत
भारत-ऑस्ट्रेलिया
भारत-ऑस्ट्रेलिया sakal

मुंबई : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये येत्या ७ जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरीची लढत ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे, पण त्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात निवडण्यात आलेल्या दोन खेळाडूंना दुखापत झाली आहे. के. एल. राहुल व जयदेव उनाडकट या दोन्ही खेळाडूंना दुखापत झाली असून त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.

राहुल व उनाडकट हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंटस्‌ संघासाठी खेळतात. बंगळूर - लखनौ यांच्यामध्ये सोमवारी लढत रंगली. या लढतीत क्षेत्ररक्षण करताना राहुलच्या पायाच्या मांडीला दुखापत झाली. लढतीआधी गोलंदाजीचा सराव करताना उनाडकट जमिनीवर पडला. त्यामुळे त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली.

राहुलची दुखापत गंभीर असल्यास त्याला सहा ते आठ आठवडे क्रिकेटपासून दूर राहावे लागू शकते. उनाडकटचा सांधा निखळला असल्यास तोही दोन महिने क्रिकेटपासून दूर राहील. बीसीसीआयच्या निवड समितीकडून जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी पर्यायी राखीव खेळाडूंची निवड करण्यात आलेली नाही. के. एस. भारत पर्यायी यष्टिरक्षक म्हणून संात आहे.

कोणाला संधी मिळेल?

राहुलला अंतिम फेरीचा सामना खेळता आला नाही, तर मग कोणत्या खेळाडूंना भारताच्या संघात संधी मिळू शकते, असा प्रश्‍न याप्रसंगी उभा राहतो. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात फॉर्ममध्ये असलेला यशस्वी जयस्वाल, इशान किशन, अभिमन्यू इस्वरन यांच्यापैकी एकासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडे होऊ शकतील.

तसेच उनाडकटऐवजी अर्शदीप सिंगला भारतीय संघात स्थान मिळू शकते. उमेश यादव व शार्दुल ठाकूर यांनाही छोटी दुखापत झाल्याचे समोर आले आहे. या दोघांची दुखापत गंभीर असल्यास भारताचा पाय आणखी खोलात जाऊ शकतो.

जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारताचा संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के. एल. राहुल, के. एस. भारत (यष्टिरक्षक), रवीचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com