esakal | रोझरीच्या विद्यार्थ्यांशी कुलदीप यादवने साधला संवाद
sakal

बोलून बातमी शोधा

cricket player kuldeep yadav visit rosary school at pune

भारतीय क्रिकेट संघातील ऑफस्पिनर गोलंदाज कुलदीप यादव याने रोझरी (कॅंम्प शाखा) शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत त्यांची मने जिंकली.

रोझरीच्या विद्यार्थ्यांशी कुलदीप यादवने साधला संवाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय क्रिकेट संघातील ऑफस्पिनर गोलंदाज कुलदीप यादव याने रोझरी (कॅंम्प शाखा) शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत त्यांची मने जिंकली.

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. कुलदीपने विद्यार्थ्यांनी मनमोकळे पणाने गप्पा मारताना गोलंदाजीतील वेगवेगळ्या टीप्स दिल्या. शिवाय, भारतीय संघामध्ये प्रवेश करताना किती मेहनत करावी लागली हे सांगताना देशासाठी भारतीय संघाकडून खेळताना अभिमान वाटत असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विनय अऱहाना, मुख्याध्यापीका उषा परेरा, प्रदीप महिंदरकर, जनार्दन पाटील, अश्विन कामत यांच्यासह 300 विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने कुलदीपचे स्वागत करण्यात आले.

loading image