esakal | न्यूझीलंडची खिलाडूवृत्ती; प्रतिस्पर्धी जखमी खेळाडूला उचलून नेले खांद्यावर

बोलून बातमी शोधा

cricket

न्यूझीलंडचा सिनियर संघाला भारताविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला. या संघातील खेळाडूंच्या सभ्यतेसाठी ओळख असतानाच ज्युनियर संघही आपला लौकीक कायम ठेवताना दिसत आहे.

न्यूझीलंडची खिलाडूवृत्ती; प्रतिस्पर्धी जखमी खेळाडूला उचलून नेले खांद्यावर
sakal_logo
By
वृत्तसंस्था

जोहान्सबर्ग : जगभरात आपल्या खिलाडूवृत्तीमुळे प्रसिद्ध असलेल्या न्यूझीलंडच्या खेळाडूंचे आणखी एका खिलाडूवृत्तीचे उदाहरण समोर आले आहे. 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडच्या दोन क्रिकेटपटूंनी वेस्ट इंडीजच्या जखमी खेळाडूला खांद्यावर उचलून घेत मैदानाबाहेर नेल्याने सर्वांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

न्यूझीलंडचा सिनियर संघाला भारताविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला. या संघातील खेळाडूंच्या सभ्यतेसाठी ओळख असतानाच ज्युनियर संघही आपला लौकीक कायम ठेवताना दिसत आहे. 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात वेस्ट इंडिजच्या क्रिक मॅकेन्झिला 99 धावांवर दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले. पण, पाय दुखावलेला असल्याने त्याला चालता येत नव्हते. त्यावेळी न्यूझीलंडच्या दोन खेळाडूंनी त्याला खांद्यावर घेत मैदानाबाहेर नेले. न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या या कामगिरीचे स्टेडियमवर उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून कौतुक केले.

या सामन्यात वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना 238 धावा केल्या. न्यूझीलंडने विंडीजचे हे आव्हान दोन गडी राखून अखेरच्या षटकात पूर्ण केले. न्यूझीलंडकडून अखेरच्या दोन फलंदाजांनी झुंजार खेळी करत न्यूझीलंडला उपांत्य फेरी गाठून दिली.