Gambhir angry on Virat | IND vs NZ: विराटवर संतापला गंभीर; म्हणाला, "प्रत्येकी वेळी..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam-Gambhir-Virat-Kohli

भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरने टीम इंडियाच्या कर्णधारावर केली सडकून टीका | Virat Kohli Trolled

IND vs NZ: विराटवर संतापला गंभीर; म्हणाला, "प्रत्येकी वेळी..."

IND vs NZ, T20 World Cup 2021: कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धा २०२१मधील सलग दुसरा सामना हारला. पाकिस्तानने भारताला १० गडी राखून पराभूत केले होते. त्यानंतर न्यूझीलंडने भारताला ८ गडी राखून सहज हरवले. भारतीय संघाने २० षटकात ११० धावा केल्या आणि न्यूझीलंडने हे आव्हान १४.३ षटकात सहज पार केले. न्यूझीलंडच्या संघाकडून पराभूत झालेल्या भारतीय संघावर जोरदार टीका झाली. त्यातच भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने कर्णधार कोहलीवर जोरदार टीका केली.

हेही वाचा: IND vs NZ: तर रोहितची हालत पाकिस्तानच्या मॅचसारखीच झाली असती!

"भारत आणि न्यूझीलंड दोघे पाकिस्तानकडून पराभूत झाले होते. दोन्ही संघांना विजय आवश्यक होता. दोन्ही संघ सारख्याच परिस्थितीत मैदानात उतरले होते. त्यामुळे त्यांच्यावर असलेला दबावदेखील समानच होता. संघाचे मनोबल वाढवणं हे कर्णधाराच्या हातात असतं. न्यूझीलंडसाठी शांत आणि संयमी केन विल्यमसनने ते योग्य प्रकारे केले. प्रत्येकी वेळी आक्रमकच असायला हवं असं काही गरजेचं नाही. काही वेळा शांत राहून आणि सकारात्मक वर्तणुकीतून देखील आपली आक्रमकता दाखवता येते. त्याचा सांघिक कामगिरीवर प्रभाव दिसून येतो. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया दिली म्हणजे तुमचं खेळावर आणि देशावर प्रेम आहे असं होत नाही", असं रोखठोक मत गौतम गंभीरने विराटबद्दल बोलताना व्यक्त केलं.

हेही वाचा: IND vs NZ : न्यूझीलंडनं भारताला रडवलं...

धावफलक :

भारत : २० षटकांत ७ बाद ११० (केएल राहुल १८- १६ चेंडू, ३ चौकार, ईशान किशन ४, रोहित शर्मा १४-१४ चेंडू, १ चौकार, १ षटकार, विराट कोहली ९. रिषभ पंत १२, हार्दिक पंड्या २३-२४ चेंडू, १ चौकार, रवींद्र जडेजा नाबाद २६-१९ चेंडू, २ चौकार, १ षटकार, शार्दुल ठाकूर ०, ट्रेंट बोल्ट ४-०-२०-३, टीम साऊदी ४-०-२६-१, अॅडम मिल्ने ४-०-३०-१, ईश सोधी ४-०-१७-२) पराभूत वि. न्यूझीलंड: १४.३ षटकांत २ बाद १११ (मार्टिन गप्टील २०-१७ चेंडू, ३ चौकार, डॅरेल मिशेल ४९-३५ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार, केन विल्यम्सन नाबाद ३३-३१ चेंडू, ३ चौकार, जसप्रित बुमरा ४-०-१९-२)