शमीला ट्रोल करणाऱ्यांना विराटची चपराक, वाचा काय म्हणाला...

न्यूझीलंड विरुद्धच्या 'करो वा मरो' लढतीपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Virat Kohli And Shami
Virat Kohli And ShamiSakal

T20 WC: भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर मोहम्मद शमीला ट्रोल करणाऱ्यांना विराट कोहलीने चांगलेच सुनावले आहे. कोणत्याही व्यक्तीला धर्माच्या आधारावर ट्रोल करणे चुकीचे आहे. मैदानाबाहेर सुरु असलेल्या डर्टी गेम बाजूला ठेवून आम्ही खेळावर लक्ष्य केंद्रीत करत आहोत, असे तो म्हणाला. न्यूझीलंड विरुद्धच्या 'करो वा मरो' लढतीपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने मोहम्मद शमीच्या ट्रोलर्संना सुनावले.

Virat Kohli And Shami
Video : पाक चाहत्याशी भिडला होता शमी, कॅप्टन कूल धोनीनं केली होती मध्यस्थी

विराट कोहली म्हणाला की, सोशल मीडियार काही लोक आपली ओळख लपवून अशा प्रकारचे कृत्य करतात. सध्याच्या घडीला हा प्रकार सर्वसामान्य झालाय. खालच्या पातळीवर जाऊन एखाद्याला लक्ष करणं चुकीच आहे. आम्ही या गोष्टी बाजूला ठेवून संघातील वातावर उत्तम ठेवण्यावर अधिक भर देतो. कोणत्याही व्यक्तीला धर्माच्या आधारावर निशाणा साधणे चुकीच आहे. मी कधीही कोणासोबत भेदभाव केलेला नाही. काही लोकांना हेच काम आहे. जर मोहम्मद शमीची खेळाबद्दलची पॅशन कुणाला दिसत नसेल तर त्याला समजावण्यासाठी वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही, असे सांगत त्याने ट्रोलर्संना आपली जागा दाखवून दिलीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com