IND vs PAK: पाहा भारताचा संघ; इशान, अश्विन संघातून बाहेर!

India vs Pakistan : भारताच्या Playing XI मध्ये वरूण चक्रवर्तीला स्थान
Team India
Team IndiaSakal
Updated on
Summary

India vs Pakistan : भारताच्या Playing XI मध्ये वरूण चक्रवर्तीला स्थान

India vs Pakistan, T20 World Cup 2021: दोन सराव सामन्यामध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन तुल्यबळ संघांना पराभवाची चव चाखायला लावणाऱ्या भारताची (Team India) आज पाकिस्तानविरोधात (Pakistan) खरी कसोटी आहे. आजपासून या दोन्ही संघाचा यंदाच्या विश्वचषकातील मूळ प्रवास सुरू होणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानच्या संघाने कालच १२ खेळाडूंचा संघ जाहीर केला होता. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने मात्र आज टॉसच्या वेळी संघ जाहीर (Playing XI) केला. त्यात काही अनुभवी तर काही नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. सराव सामन्यातील स्टार खेळाडू इशान किशनला (Ishan Kishan Excluded) मात्र संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. (Ind vs Pak T20 World Cup 2021 Team India Playing Xi against Pakistan Excludes Ishan Kishan Ashwin Shardul Thakur)

भारतीय संघाचा पहिला सराव सामना इंग्लंडविरोधात होता. त्यावेळी इशान किशनने नाबाद ७० धावांची दमदार खेळी केली होती. पण आजच्या सामन्यात त्याला संधी देण्यात आली नाही. त्यासोबत भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यालाही संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. युवा वरूण चक्रवर्ती याला संघात स्थान दिले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गोलंदाजीबाबत साशंकता असूनही हार्दिक पांड्याला संघात स्थान मिळाले आहेत आणि शार्दूल ठाकूरला संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे अनुभवी त्रिकुट संघात असणार आहे.

असा आहे भारताचा संघ

फलंदाज- विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत

अष्टपैलू- हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा

गोलंदाज- भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com