IND vs NZ Head to Head | T20 WC : भारत की न्यूझीलंड.. टी२० वर्ल्ड कप मध्ये कोण भारी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit-Sharma-vs-Trent-Boult

भारत आणि न्यूझीलंडची ही आकडेवारी एकदा पाहाच | India vs New Zealand T20 World Cups

T20 WC : भारत की न्यूझीलंड.. टी२० वर्ल्ड कप मध्ये कोण भारी?

India vs New Zealand, T20 World Cup 2021: भारताचा टी२० विश्वचषकातील आज दुसरा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. भारताला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून अपमानकारक पराभव पत्करावा लागला होता. न्यूझीलंडचादेखील हा स्पर्धेतील दुसरा सामना आहे. त्यांनाही पहिल्या सामन्यात पाकिस्तानने पराभूत केले होते. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासांठी अतिशय महत्त्वाचा आहे. कागदावर पाहता, कोणत्या संघाचं पारडं जड राहणार याचा अंदाज बांधणं कठीण आहे. पाहूया या दोन संघांची एकमेकांविरूद्धची कामगिरी....

Virat-Kohli-Kane-Williamson

Virat-Kohli-Kane-Williamson

पाहा आकडेवारी काय सांगते

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण १६ टी२० सामने खेळण्यात आले आहेत. त्यापैकी भारताचा ८ सामन्यात तर न्यूझीलंडचा ८ सामन्यात विजय झाला आहे. पण टी२० विश्वचषकात आतापर्यंत हे दोन संघ दोन वेळा आमनेसामने आले असून दोन्ही वेळा भारतीय संघ पराभूत झाला आहे. इतकंच नव्हे तर २००७ च्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता असलेला भारतीय संघ त्या स्पर्धेत केवळ एकाच सामन्यात पराभूत झाला होता. त्यावेळीदेखील भारताला केवळ न्यूझीलंडनेच पराभूत केलं होतं.

Virat-Kohli-Rohit-Sharma-MS-Dhoni

Virat-Kohli-Rohit-Sharma-MS-Dhoni

भारत-न्यूझीलंड यांच्यातील १६ सामन्यांत आणखी एक आकडेवारी अशी की भारताने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ५ वेळा विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ वेळा विजय प्राप्त केला आहे. याशिवाय, आव्हानाचा पाठलाग करताना भारत ३ वेळा तर न्यूझीलंड २ वेळा विजयी झाला आहे. त्यामुळे या आकडेवारीनुसार, दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचं दिसत आहे.