T20 WC: विराटच्या विधानामुळे जाडेजा झाला नाराज; पाहा कारण

विराट कोहलीने नुकतंच एका मुद्द्यावर मत मांडलं | Virat Kohli Press Conference
Virat-Kohli-Puzzled
Virat-Kohli-Puzzled
Summary

विराट कोहलीने नुकतंच एका मुद्द्यावर मत मांडलं | Virat Kohli Press Conference

T20 World Cup: पाकिस्तानने सलामीच्या सामन्यात भारतीय संघाला पराभूत केले. भारताचा तो वर्ल्ड कपमधील पाकिस्तानविरूद्धचा पहिला पराभव ठरला. पाकिस्तानच्या भेदक माऱ्यापुढे भारताला १५१ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनी नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली याने पत्रकार परिषदेत असं विधान केलं की त्यामुळे जाडेजा काहीसा नाराज झाला.

Virat-Kohli-Puzzled
T20 WC: रोहित शर्माबद्दल केविन पीटरसनची मोठी भविष्यवाणी

नक्की काय घडलं?

"विराट कोहली सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाला की जेव्हा पाकिस्तानविरूद्ध आमचे दोन बळी झटपट बाद झाले, तेव्हा आम्ही सामन्यात थोडेसे पिछाडीवर पडल्याची भावना होती. मला या विधानावर आक्षेप आहे. मी या विधानाबाबत नाराज आहे. जेव्हा खुद्द विराट कोहली मैदानात असतो, त्यावेळी सामना कधीच संपलेला नसतो किंवा सामन्यात कधीच भारतीय संघ कधीच पिछाडीवर पडत नाही. विराटने मैदानात जाऊन दोन चेंडूही खेळले नव्हते, त्या आधीच तो असा विचार करत होता. यातून भारतीय संघाचा प्रतिस्पर्धी संघाबद्दलचा दृष्टीकोन दिसू येतो आणि त्यामुळेच मी नाराज आहे", असं भारताचा माजी फलंदाज अजय जाडेजा म्हणाला.

Ajay-Jadeja
Ajay-Jadeja
Virat-Kohli-Puzzled
T20 WC: "हार्दिकला बाहेर हकला अन् 'त्याला' टीममध्ये घ्या"

दरम्यान, भारताच्या न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर संघाचे लक्ष आहे. अनेकांनी हार्दिक पांड्या आणि इतर खेळाडूंच्या कामगिरीबद्दल तसेच निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते. आता न्यूझीलंड विरूद्ध भारताचा ३१ ऑक्टोबरच्या रविवारी सामना रंगणार आहे. पाकिस्तानच्या संघाने या दोघांनाही पराभूत केल्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात एक चूकही खूप महागात पडू शकते. त्यामुळे भारताचा संघ आपला सर्वोत्तम संघ मैदानात उतरवेल. गेल्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे तो गोलंदाजी करू शकलेला नव्हता. तसेच, IPL च्या दुसऱ्या टप्प्यातही त्याने गोलंदाजी केली नव्हती. त्यामुळे पुढील सामन्यात त्याला संघात घेतलं जाईल का? आणि तो गोलंदाजी करू शकेल का? याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. असं असताना BCCI ने टीम इंडियाच्या सराव सत्राचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यात हार्दिक पांड्या फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव करताना दिसत होता. इतकंच नव्हे तर हार्दिकच्या गोलंदाजीवर कर्णधार विराट कोहली, मेंटॉर महेंद्रसिंग धोनी आणि मुख्य कोच रवी शास्त्री नजर ठेवून असल्याचं दिसलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com