VIDEO : बेस्ट कॅच! केन विल्यमसनने बेयरस्टोला धाडलं तंबूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Williamson catch
VIDEO : बेस्ट कॅच! केन विल्यमसनने बेयरस्टोला धाडलं तंबूत

VIDEO : बेस्ट कॅच! केन विल्यमसनने बेयरस्टोला धाडलं तंबूत

England vs New Zealand, 1st Semi-Final : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सेमी फायनल सामना अबुधाबीच्या मैदानात रंगला आहे. केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या धावफलकावर अवघ्या 37 धावा असताना मिल्नेनं संघाला पहिले यश मिळवून दिले. बेयरस्टो 13 धावांवर झेलबाद झाला.

T20 WC ENG vs NZ : पहिल्या सेमी फायनलमधील सर्व अपडेट्स एका क्लिकवर

पावर प्लेच्या अखेरच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात सलामीवीर बेयरस्टोनं विकेट फेकली. ही विकेट मिल्नेच्या खात्यात जमा झाली असली तरी कर्णधार विल्यमसनने फिल्डिंगचा सर्वोत्तम दर्जा दाखवून देत संघाला पहिले यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बेयरस्टोच्या भात्यात मोठी फटकेबाजी करण्याची ताकद आहे. जेसन रॉयच्या जागी संघाची सुरुवात करताना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती पण त्याला नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले.

Web Title: Kane Williamson Superb Catch Of Jonny Bairstow In England Vs New Zealand T20 World Cup 2021 Semifinal Match

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..