Virender-Sehwag
Virender-Sehwag

T20 WC: "हे खरंच धक्कादायक"; सेहवागकडून चाहत्यांची खरडपट्टी

एका मुद्द्यावरून सेहवागने घेतली फॅन्सची शाळा
Published on
Summary

एका मुद्द्यावरून सेहवागने घेतली फॅन्सची शाळा

IND vs PAK, T20 World Cup 2021: भारतीय संघाचा टी२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने १० गडी राखून दणदणीत पराभव केला. पाकिस्तानच्या संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत आजपर्यंत १२ वेळा भारताकडून सपाटून मार खाल्ला होता. मात्र कालच्या सामन्यात पाकिस्तानने सव्याज परतफेड केली. विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत ५७ धावा केल्या आणि संघाला १५१ धावांपर्यंत पोहोचवले. हे आव्हान पाकिस्तानच्या संघाने एकही गडी बाद न होऊ देता सहज पार केलं. त्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर टीका करणाऱ्यांची विरेंद्र सेहवागने खरडपट्टी काढली.

Virender-Sehwag
T20 WC IND vs PAK : "शाब्बास पाकिस्तान, यालाच म्हणतात..."

टीम इंडियाच्या एकाही गोलंदाजाला पाकिस्तानची विकेट घेता आली नाही. त्यानंतर भारतातील काही चाहत्यांनी मोहम्मद शमीवर टीका केली. त्याच्या धर्मावरून तसेच देशाप्रति असलेल्या प्रामाणिकपणावर काहींनी शंका घेतली. पण अशा साऱ्यांना माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग याने सुनावलं. "मोहम्मद शमी सारख्या गोलंदाजावर भारतीयांनीच अशाप्रकारची टीका करणं धक्कादायक आहे. माझा शमीला पूर्ण पाठिंबा आहे. तो चॅम्पियन गोलंदाज आहे. जो कोणी भारतीय संघाची टोपी आणि जर्सी घालतो तो मनाने पूर्णपणे भारतीयच असतो. त्यामुळे ऑनलाईन मॉबच्या टीकेला कोणीही बळी पडू नये. पुढच्या मॅचमध्ये तुझा जलवा दाखव", अशा शब्दात त्याने चाहत्यांची खरडपट्टी काढली आणि टीम इंडियाला पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत ५७ धावा केल्या आणि संघाला १५१ धावांपर्यंत पोहोचवले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनीच सामना संपवला. रिझवानने ५५ चेंडूत नाबाद ७९ धावा कुटल्या. तर बाबर आझमने ५२ चेंडूत नाबाद ६८ धावा करत त्याला साथ दिली आणि संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com