MS-Dhoni-Rishabh-Pant-Video
MS-Dhoni-Rishabh-Pant-Video

मॅच बघत बसू नको, सराव कर... पाहा धोनी-पंतचा 'हा' धमाल Video

Published on
Summary

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातच धोनीने घेतली पंतची प्रॅक्टिस

T20 World Cup India v Australia Warm up: मूळ स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने सलग दुसऱ्या सराव सामन्यात विजय मिळवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा फलंदाजांनी योग्य वापर केला नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघाने २० षटकात १५२ धावा केल्या. हे आव्हान भारताने १८व्या षटकातच पूर्ण केले. या दरम्यान धोनी आणि पंत यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला.

MS-Dhoni-Rishabh-Pant-Video
T20 WC: टीम इंडियाचा 'हा' खेळाडू सामना फिरवू शकतो - लक्ष्मण

ऑस्ट्रेलिाच्या संघाने पहिल्या ४ षटकात १४ धावा करत तीन बळी गमावले होते. ऋषभ पंतला कालच्या सराव सामन्यात स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे ऋषभ पंत सामना बघत होता. पण त्या दरम्यान महेंद्रसिंग धोनी मैदानात आला. धोनी सध्या संघाचा मेंटॉर म्हणून टीम इंडियासोबत आहे. त्यामुळे त्याने सामना बघत बसलेल्या ऋषभ पंतला सोबत घेतलं आणि मैदानाच्या बाहेर सीमारेषेच्या जवळ स्टंपिंग ड्रील (सराव) शिकवण्यास सुरूवात केली.

पाहा ऋषभ पंत आणि महेंद्रसिंग धोनीचा व्हिडीओ-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com