Pat Cummins : IPL 2025 पूर्वी पॅट कमिन्सने उचलले मोठे पाऊल! आता 'या' नव्या संघाचा होणार कर्णधार

Pat Cummins Will Play for San Francisco : सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने आयपीएल 2024 मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती.
Pat Cummins Will Play for San Francisco
Pat Cummins Will Play for San Franciscosakal

Pat Cummins Will Play for San Francisco : सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने आयपीएल 2024 मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने सनरायझर्स हैदराबादला अंतिम फेरीत नेले. आता पॅट कमिन्सने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पॅट कमिन्स सॅन फ्रान्सिस्को संघाकडून खेळताना दिसणार आहे.

Pat Cummins Will Play for San Francisco
NAM vs OMA T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपच्या तिसऱ्याच मॅचमध्ये रंगली सुपर-ओव्हर! रोमांचक सामन्यात नामिबियाचा विजय

गेल्या हंगामात आरोन फिंच सॅन फ्रान्सिस्को संघाचा कर्णधार होता पण आता तो निवृत्त झाला आहे. आणि त्यामुळेच पॅट कमिन्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार पॅट कमिन्सला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.

पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार आहे. मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेऊन त्याने एक मोठे पाऊल उचलले आहे. तो अद्याप अनेक टी-20 लीगमध्ये खेळलेला नाही पण मेजर लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

Pat Cummins Will Play for San Francisco
Ind vs Ire T20 WC24 : 5 जूनला भारत-आयर्लंड सामना पावसामुळे रद्द तर… कोणाला होणार फायदा?

टी-20 वर्ल्ड कपनंतर लगेच ही स्पर्धा सुरू होणार आहे. त्यामुळे पॅट कमिन्स आपला फिटनेस कसा राखणार हे पाहणे मनोरंजक ठरेल. फेब्रुवारीपासून तो सतत खेळत आहे. प्रथम तो न्यूझीलंड दौऱ्यावर गेला.

यानंतर, तो संपूर्ण आयपीएल दोन महिने खेळला आणि आता तो टी-20 वर्ल्ड कपमध्ये व्यस्त आहे आणि त्यानंतर लवकरच त्याला मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळावे लागेल. अशा परिस्थितीत तो स्वत:ला पूर्णपणे तंदुरुस्त ठेवण्यास सक्षम आहे की नाही हे पाहणे बाकी आहे. मेजर लीग क्रिकेटचा दुसरा हंगाम ५ जुलैपासून सुरू होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com