IND vs PAK in T20 WC | आफ्रिदी 'टीम इंडिया'ला झेपला नाही- पाकिस्तान कोच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Afridi-Pak-Ind

शाहीन शाह आफ्रिदीने भारताचे तीन बडे फलंदाज धाडले होते माघारी | Matthew Hayden on Shaheen Afridi

T20 WC: आफ्रिदी 'टीम इंडिया'ला झेपला नाही- पाकिस्तान कोच

IND vs PAK, T20 WC 2021: भारताचा पहिला टी२० विश्वचषक सामना पाकिस्तानविरूद्ध रंगला होता. त्यात भारताला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पाकिस्तानने न्यूझीलंडलाही पराभूत केले. त्यामुळे आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. भारतीय संघाला पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी याने वेगवान गोलंदाजी करत सळो की पळो करून सोडलं. रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली अशा तीन दिग्गजांचा त्याने काटा काढला. शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीबाबत बोलताना पाकिस्तानच मॅथ्यू हेडनने एक विधान केलं.

हेही वाचा: T20 WC: "हार्दिकला बाहेर हकला अन् 'त्याला' टीममध्ये घ्या"

Shaheen-Shah-Afridi

Shaheen-Shah-Afridi

"भारतीय फलंदाज IPL दरम्यान दुबईच्या खेळपट्ट्यांवर ताशी १३० किलोमीटर वेगाने येणाऱ्या चेंडूंवर फटकेबाजी करत होते. पण शाहिन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीचा वेग त्यापेक्षा खूप जास्त आहे. भारतीय गोलंदाजांना त्या वेगाचा सामना करणं झेपलं नाही. गेल्या पाच आठवड्यात जितकं क्रिकेट मी पाहिलंय, त्यात रोहित आणि राहुलचा विकेट घेणारे दोन चेंडू हे मला आवडलेले सर्वोत्तम दोन चेंडू होते. डावखुऱ्या गोलंदाजाने इन स्विंग होणाऱ्या चेंडूवर रोहितला बाद करणं हे खूपच खास होतं", असं पाकिस्तानी हेड कोच मॅथ्यू हेडन म्हणाला.

हेही वाचा: T20 WC: हार्दिकच्या गोलंदाजीवर शास्त्री, धोनी नि विराटची नजर

Shaheen Afridi

Shaheen Afridi

"IPL मध्ये केएल राहुलचा फॉर्म कमाल होता. त्याच्या फलंदाजीला फटकेबाजीची छान जोड मिळाली होती. ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत असलेल्या राहुलचा पाकविरूद्धच्या सामन्यात मिडल स्टंप बॅटला चेंडू लागून उडाला. ही बाब मी पाच आठवड्याच्या IPL मध्ये एकदाही पाहिली नव्हती. शाहीन आफ्रिदीने जे दोन बळी सुरूवातीला मिळवले, त्यामुळे पूर्ण सामन्याचा मूड बदलला आणि पाकिस्तानला सामना जिंकणं सोपं गेलं", असंही हेडन म्हणाला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top