INDvsPAK: शाहिन आफ्रिदी चमकला; रोहित, राहुल, विराटला केलं बाद

India vs Pakistan : आफ्रिदीने ३१ धावांत घेतले ३ बळी
Shaheen-Shah-Afridi
Shaheen-Shah-Afridi
Summary

India vs Pakistan : आफ्रिदीने ३१ धावांत घेतले ३ बळी

India vs Pakistan, T20 World Cup 2021: पाकिस्तान विरूद्धच्या टी२० वर्ल्ड कप सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ७ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार विराट कोहलीच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताला दीडशतकी मजल मारता आली. विराटने ५७ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त ऋषभ पंतने ३९ धावांची खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला. पण इतर फलंदाजांना फारसा प्रभाव करता आला नाही. भारताच्या दमदार फलंदाजी युनिटला रोखण्यात सर्वात मोठा वाटा होता तो पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीचा... त्याने दमदार कामगिरी करत पाकला सामन्यात वरचढ होण्याची संधी दिली. (Shaheen Shah Afridi Superb Bowling takes 3 Wickets of Rohit Sharma KL Rahul Virat Kohli IND vs PAK T20 World Cup 2021)

Shaheen-Shah-Afridi
IND vs PAK : आफ्रिदीच्या मनात अजूनही टीम इंडियाची 'दहशत'

नुकत्याच पार पडलेल्या IPL 2021 मध्ये आणि त्यानंतर रंगलेल्या दोन सराव सामन्यांमध्ये सलामीवीर लोकेश राहुलने दमदार फलंदाजी केली होती. त्याच्याकडून भारतीय संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण त्याला ती अपेक्षा पूर्ण करता आली नाही. तसेच, रोहित शर्माच्या पदरीदेखील निराशाच आली. या दोघांना शाहीन आफ्रिदीने तंबूत धाडलं. तसंच, १९व्या षटकात गोलंदाजी करताना अर्धशतकवीर विराट कोहलीलाही त्याने बाद केलं. योग्य वेळी चेंडूच्या गतीत बदल करत त्याने विराटला माघारी पाठवले. त्यामुळे शाहीन आफ्रिदीने ४ षटकांच्या आपल्या स्पेलमध्ये ३१ धावा देत ३ महत्त्वाचे बळीदेखील बाद केले.

Shaheen-Shah-Afridi
IND vs PAK: विराट कोहलीच्या फोटोवर रणवीर सिंगची भन्नाट कमेंट

शाहीन आफ्रिदीच्या कामगिरीनंतर त्याचा ट्विटरवरही उदो उदो करण्यात आला. शाहीनच्या गोलंदाजीची अनेक बड्या आजी माजी खेळाडूंनी स्तुती केली. शाहीनमुळे पाकिस्तानच्या डोक्यावरील भारताविरूद्धच्या सामन्याचं दडपण कमी होण्यास खूपच मदत झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com