Akhtar slams Warner | "हे खूप चुकीचं आहे"; वॉर्नर मालिकावीर अन् अख्तरचं जळजळीत विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"खूप चुकीचं आहे"; वॉर्नर मालिकावीर अन् अख्तरचं जळजळीत विधान

पाहा, नक्की काय म्हणाला शोएब अख्तर

"खूप चुकीचं आहे"; वॉर्नर मालिकावीर अन् अख्तरचं जळजळीत विधान

sakal_logo
By
विराज भागवत

NZ vs AUS, T20 World Cup Final: कसोटी विश्वविजेता संघ न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाने रविवारी ८ गडी राखून पराभूत केले आणि टी२० विश्वचषक जिंकला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याच्या ८७ धावांच्या जोरावर त्यांनी १७२ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर मिचेल मार्श (नाबाद ७७) आणि डेव्हिड वॉर्नर (५३) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपद जिंकले. डेव्हिड वॉर्नरला स्पर्धेतील कामगिरीमुळे मालिकावीराचा किताब मिळाला, पण ICC चा हा निर्णय पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याला पटला नाही. त्याने ट्वीट करून याबद्दल नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: T20 WC: बाबरचं 'त्रिशतक' पाण्यात; वॉर्नर ठरला मॅन ऑफ द सीरीज!

टी२० विश्वचषक स्पर्धा २०२१ मध्ये पाकिस्तानचा बाबर आझम याने ६ सामन्यात ३०३ धावा केल्या. या स्पर्धेत त्याच्या सर्वाधिक धावा होत्या. त्याच्या खात्यात ४ अर्धशतके होती. त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर याने ७ सामन्यांमध्ये ३ अर्धशतकांसह २८९ धावा केल्या. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला जेव्हा जलदगतीने धावा करणं आवश्यक होतं, तेव्हा वॉर्नरने दमदार फलंदाजी करत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. त्याला मालिकावीराचा किताब प्रदान करण्यात आला. पण शोएब अख्तरला मात्र हा निर्णय पटला नाही. "माझी अशी अपेक्षा होती की बाबर आझमला त्याच्या दमदार कामगिरीसाठी मालिकावीराचा किताब देण्यात येईल. पण तेथे जे काही घडलं, तो निर्णय खूपच चुकीचा आहे", अशा स्पष्ट शब्दात अख्तरने नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: शोएब अख्तर म्हणतो, आमच्यासाठी हा क्रिकेटर 'भारताचा इंजमाम'!

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजी दिली होती. न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टीलने संथगतीने २८ धावा केल्या. इतर कोणालाही मोठी खेळी उभारता आली नाही. पण केन विल्यमसनने कर्णधारपदाला साजेशी ४८ चेंडूत ८७ धावांची खेळी केली आणि संघाला १७२ धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून आधी डेव्हिड वॉर्नरने दमदार अर्धशतक ठोकलं. त्याने ५३ धावा केल्या. त मिचेल मार्शने नाबाद ७७ धावांची खेळी करत संघाला पहिला टी२० विश्वचषक मिळवून दिला.

loading image
go to top