Video : 148 kmph गतीचा यॉर्कर, बॅट उचलताच रसेलच्या उडल्या दांड्या | T20 World Cup 2021 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Andre Dwayne Russell
Video : 148 kmph गतीचा यॉर्कर, बॅट उचलताच रसेलच्या उडल्या दांड्या

Video : 148 kmph गतीचा यॉर्कर, बॅट उचलताच रसेलच्या उडल्या दांड्या

T20 World Cup 2021, South Africa vs West Indies : दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना वेस्ट इंडीज संघाने निर्धारित 20 षटकात 8 बाद 143 धावा केल्या. वेस्ट इंडीजकडून एविन लुईसने 35 चेंडूत केलेल्या 56 धावांच्या खेळीशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. कर्णधार पोलार्डने संघाच्या धावसंख्येत 26 धावांची भर घातली.

लुईसने 6 षटकार आणि 3 चौकार खेचत खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे दाखवून दिले. पण त्याच्या सहकाऱ्यांना त्याच्यासारखी फटकेबाजी जमली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियसने 17 धावा खर्च करुन सर्वाधिक तीन विकेट घेतल्या त्याला केशव महाराज कागिसो रबाडा यांनी 2-2 विकेट घेत उत्तम साथ दिली. आफ्रिकेच्या ताफ्यातील सर्वात वेगवान गोलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या नोर्तजेनं एक विकेट मिळवली. 4 षटकात 14 धावा खर्च करत त्याने मसल पॉवर आंद्रे रसेलला (Andre Russell) तंबूत धाडले.

हेही वाचा: कोच पदासाठी द्रविड यांचा अर्ज; BCCI देणार शास्त्रींपेक्षा मोठं पॅकेज

नॉर्तजेनं रसेलला टाकलेला चेंडू कमालीचा होता. जवळपास 148 kmph वेगाने आलेला चेंडू मारण्यासाठी रसेलने बॅट उचलली खरी. पण रसेलला चेंडू कळण्याआधीच त्याच्या दांड्या उडल्या. आयसीसीने जबरदस्त यॉर्करवर नॉर्तजेनं घेतलेल्या विकेट्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. क्रिकेट चाहते या व्हिडिओला चांगली पसंती देताना दिसते.

हेही वाचा: Video : पाक चाहत्याशी भिडला होता शमी, कॅप्टन कूल धोनीनं केली होती मध्यस्थी

वेस्ट इंडीजच्या संघाने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 55 धावांवर आटोपला होता. पहिला सामना गमावल्यानंतर स्पर्धेतील पहिला विजय नोंदवण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजला चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. केरॉन पोलार्ड, रसेल यांच्या भात्यातील फटकेबाजीचा दुष्काळ दोन वेळच्या चॅम्पियन कॅरेबियन संघाची डोकेदुखी वाढवणारी आहेत.

Web Title: T 20 World Cup 2021 Savwi Anrich Nortje Yorker Bowled Speed Of 148 Kmph Russell Got Bowled Watch Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..