Record : पाकला T-20 World Cup जिंकण्याची अधिक संधी; पण...

यजमानपद भारताकडे असले तरी एका अर्थाने ही स्पर्धा पाकिस्तानच्या माहेर घरात होत आहे
Pakistan Cricket Team
Pakistan Cricket TeamT20 World Cup Twitter

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने सलामीच्या लढतीत ऐतिहासिक कामगिरी करुन दाखवली. टीम इंडिया विरुद्धच्या पराभवानंतर त्यांनी आपल्या गटातील सेमीफायलचा प्रमुख दावेदार असलेल्या न्यूझीलंड संघालाही दणका दिला. खरं तर युएईच्या मैदानातील स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असले तरी एका अर्थाने ही स्पर्धा पाकिस्तानच्या माहेर घरात होत आहे. या मैदानात पाकिस्तानची आकडेवारीही कमालीची आहे. कामगिरीत सातत्य राखून पाकिस्तान संघाने फायनल गाठली तर नवल वाटू नये. पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे आकडेवारी नेहमी साथ देतेच असे नाही, हे देखील त्यांना लक्षात ठेवावे लागेल.

क्रिकेट जगतात सध्याच्या घडीला भारतीय संघाचा बोलबाला आहे, हे कोणीही नाकारणार नाही. त्यामुळेच भारताविरुद्धचा विजय पाकिस्तान संघाला आणखी आत्मविश्वास देणाराही ठरु शकतो. विराट कोहलीसाठी कॅप्टन्सीच्या दृष्टीने पहिला आणि अखेरचा टी-20 वर्ल्ड कप आहे. आयसीसीच्या स्पर्धेत कोहलीचं लक फॅक्टर गडबडताना दिसत असले तरी मेंटॉर धोनीच्या साथीनं त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच जिंकावी, असे वाटत असले तरी आकडेवारी ही पाकिस्तानच्या बाजूनं झुकणारी आहे.

UAE तील मैदाने पाकिस्तानसाठी माहेर घर!

2009 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकन संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. या घटनेमुळे पाकिस्तान क्रिकेटची चांगलीच गोची झाली. सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणताही संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यास तयार नव्हता. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संयुक्त अमिरात क्रिकेट बोर्ड यांच्यात एक करार झाला. पाकिस्तानच्या बहुंताश द्विपक्षिय मालिका या युएईच्या मैदानात खेळवण्यात आल्या. युएईचे मैदान हे पाकिस्तानचे घरचे मैदान झाल्याचे पाहायला मिळाले.

युएईच्या मैदानात पाकचा बोलबाला

टी-20 सामन्याचा विचार केल्यास पाकिस्तान संघाने युएईच्या मैदानात 36 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यातील 22 सामन्यात त्यांना विजय मिळाला असून 14 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. UAE च्या मैदानात खेळलेल्या अखेरच्या 11 सामन्यात पाकिस्तानचा संघ अपराजित राहिला आहे. यात त्यांनी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजसोबत सामने खेळले होते. नोव्हेंबर 2018 मध्ये पाकिस्तान संघाने युएईच्या मैदानात अखेरचा टी-20 सामना खेळला होता.

UAE तील कोणत्या मैदानात कशी कामगिरी राहिलीये?

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रमुख लढती या युएईतील दुबई, अबूधाबी आणि शारजाच्या मैदानात खेळवण्यात येत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर Dubai International Cricket Stadium In UAE पाकिस्तानने 25 टी-20 सामने खेळले आहेत. यातील 15 सामन्यात त्यांना विजय मिळाला असून 10 सामन्यात त्यांनी पराभव स्विकारला आहे. अबुधाबीच्या Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi वर पाकिस्तानने 9 पैकी 6 सामन्यात विजय नोंदवला आहे. तर 3 सामने त्यांनी गमावले आहेत. शारजाच्या मैदानातील पाकचे रेकॉर्ड हे फिफ्टी-फिफ्टी आहे. त्यांनी दोन पैकी एक सामना जिंकला असून एक सामना गमावला आहे.

UAE तील पाकिस्तानचे हिरो

युएईच्या मैदानात पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये मोहम्मद हाफिज अव्वलस्थानी आहे. त्याने 27 सामन्यात 24.59 च्या सरासरीने 541 धावा केल्या आहेत. त्याच्या खालोखाल अष्टपैलू अनुभवी खेळाडू शोएब मलिक दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 449 धावा आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने 49 च्या सरासरीने 392 धावा कुटल्या आहेत. (यात सध्याच्या स्पर्धेतील धावांचा समावेश नाही) गोलंदाजीत हसन अलीच्या खात्यात सर्वाधिक 15 बळी जमा आहेत.

मागील टी-20 वर्ल्ड कपमधील चुकांमध्ये यंदा सुधारणा

पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाने फायनलपर्यंत मजल मारली होती. पण यावेळी त्यांना भारतीय संघाने फायनलमध्ये पराभूत केले होते. या पराभवातून सावरुन 2009 भारतापोठोपाठ त्यांनी टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरले. यूपूर्वी 2016 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला सेमीफायनल गाठता आली नव्हती. भारत, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने त्यांना पराभवाचा दणका दिला होता. गत टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील चुका सुधारुन त्यांनी यंदाच्या साखळी सामन्यात भारत-न्यूझीलंड यांना पराभूत करुन आपली दावेदारी भक्कम केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com