T20 WC : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातही भारत-पाकप्रमाणेच 36 चा आकडा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

australia vs new zealand
T20 WC : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातही भारत-पाकप्रमाणेच 36 चा आकडा!

T20 WC : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातही भारत-पाकप्रमाणेच 36 चा आकडा!

sakal_logo
By
सुशांत जाधव

T20 WC, Final: टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलंड हे दोन संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. रविवारी 14 नोव्हेंबरला दुबईच्या मैदानात हा सामना खेळवण्यात येणार आहे. आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडला नमवून न्यूझीलंडने फायनल गाठली आहे. दुसरीकडे यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानला शह देत ऑस्ट्रेलियाचा संघ फायनलमध्ये पोहचला आहे.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकदा एकमेकांसमोर आले आहेत. पण आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत जेतेपदासाठी या दोन्ही संघातील सामना खास असाच आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलंड या दोन देशात अनेक मुद्यांवर 36 चा आकडा आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलंड या दोन देशात अनेक मुद्यांवर 36 चा आकडा आहे. क्रिकेटशिवाय अन्य क्रीडा प्रकारात याची अनुभूती येते. समुद्र सीमेच्या मुद्यावरुन दोन्ही देशांतील संबंध हे तणापूर्ण आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याला जसे युद्धजन्य स्वरुप असते अगदी तसाच प्रकार या दोन्ही देशातील क्रिकेट सामन्यात अनुभवायला मिळतो. जाणून घेऊयात ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड यांच्यातील काही रंजक गोष्टी...

-ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दोन्ही देश तस्मान समुद्र किनाऱ्यालगत वसले आहेत. दोन्ही देशातील प्रवास करण्यासाठी तस्मान समुद्रपार करावा लागतो. त्यामुळेच दोन्ही देशातील इतिहासाला ट्रांस-तस्मान नावानेही संबोधले जाते.

-दोन्ही देशांत काही मुद्यावरुन चांगलीच जुगलबंदी ऐकायला मिळते. पण टेस्ट सीरीज़, कम्युनिकेशन सेवा आणि अन्य काही गोष्टींमुळे दोन्ही देशांतील संबंध जपण्याचाही प्रयत्न केला जातो.

-खाद्य पदार्थावरुन दोन्ही देशात एक मोठा वाद प्रसिद्ध आहे. Pavlova डिश कोणाची? हा दोन्ही देशातील वादाचा मुद्दा आहे. ऑस्ट्रेलिया ही डिश आपली असल्याचा गवगवा करते. तर न्यूझीलंड हा खाद्य पदार्थ आमचा असल्याचा दावा करतो. भारतामध्ये बंगाल आणि ओडिसा यांच्यात रसगुल्ला कोणचा यावरुन जुगलबंदी रंगते अगदी तसाच काहीसा प्रकार ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पाहायला मिळतो.

- ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशातील नागरिक नेहमी एकमेंकाच्यावरुन विनोद करतात. ही गोष्ट आता सर्वसामान्य झाली आहे. अनेक लोक न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाचा भाग मानतात. न्यूझीलंडवाल्यांना हे अजिबात मान्य नसते.

-1930 पासून कॉमनवेल्थ गेम्समधून दोन्ही देश एकमेकांविरुद्ध मैदानात उतरत आहेत. क्रिकेटशिवाय रग्बी, नेट बॉल, हॉकीसह अन्य क्रीडा क्षेत्रात दोन्ही देशात कडवी टक्कर असते. दोन्ही देशातील टेस्ट मालिका त्यांच्या क्षेत्रातील अ‍ॅशेस म्हणून ओळखली जाते.

-आतापर्यंत कोणत्याही टी-20 वर्ल्ड कपमध्ये हे दोन संघ फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध भिडलेले नाहीत. 2015 मध्ये वनडे वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही देशात फायनलचा सामना रंगला होता. यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया एकही तब से कोई आईसीसी ट्रॉफी नहीं जीता है, जबकि न्यूजीलैंड ने हाल ही में टेस्ट चैम्पियनशिप जीती है.

loading image
go to top