Viral Video: पाकला पराभूत करण्याचे स्वप्न तुटले अन् मग भारतात TV सेट फुटले!

गोलंदाजी आणि फलंदाजीसह सर्व स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवत पाकिस्तानने भारताविरुद्धची पराभवाची मालिका खंडीत केली.
IND vs PAK
IND vs PAKSakal

दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात रंगलेल्या ICC टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाला मोठ्या फरकाने पराभूत केले. गोलंदाजी आणि फलंदाजीसह सर्व स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवत पाकिस्तानने भारताविरुद्धची पराभवाची मालिका खंडीत केली. वर्ल्ड कपच्या इतिहासात भारतीय संघावर पहिल्यांदाच पराभवाची नामुष्की ओढावली आहे. टीम इंडियाच्या ढिसाळ कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या पदरी निराशा पडली.

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना मैदानातील खेळाडूंशिवाय मैदानाबाहेर दोन्ही देशांच्या समर्थकांमध्येही रंगलेला असतो. वर्ल्ड कपमधील टीम इंडिया विरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी टिव्ही फोडला, अशा बातम्या यापूर्वी ऐकायला मिळाल्या आहेत. यावेळी मात्र टीव्हीची फोडाफोड ही भारतात झालीये. बिहारमधील फारबिसगंज येथे एका क्रिकेट चाहत्याने सामन्यानंतर टीव्ही सेट फोडल्याचा प्रकार घडला.

फारबिसगंज येथील छोओपट्टी येथे भारत-पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज रंगत पाहण्याची रविवारी सकाळपासून जय्यत तयारी करण्यात आली होती. काही ठिकाणी प्रोजेक्टर लावण्यात आले होते तर काही ठिकाणी टीव्ही सेटवरच लोकांनी मॅचचा आनंद घेण्याचा प्लॅन बनवला होता. भारतातील अनेक क्रिकेट चाहते टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलग सहाव्या विजयासह षटकार खेचावा यासाठी प्रार्थना करत होते. पण सामन्याचा निकाल आश्चर्यकारकरित्या पाकिस्तानच्या बाजूनं लागला. भारतीय संघाने दिलेल्या 152 धावांचा पाठलाग करताना कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनीच टार्गेट पार करत पाकिस्तानी संघाला 10 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला. सामन्याच्या निकालानंतर भारतीय चाहत्याने टीव्ही सेट, मोबाईल फोडल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com