AUS vs NZ T20WC Final : सामन्यातील महत्त्वाचे क्षण एका क्लिकवर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

AUS vs NZ

AUS vs NZ T20WC Final : सामन्यातील महत्त्वाचे क्षण एका क्लिकवर...

AUS vs NZ, T20 World Cup Final: न्यूझीलंडने दिलेल्या धावांचा पाठलाग सहजरित्या करत ऑस्ट्रेलियाने टी-20 मधील पहिला वहिला वर्ल्ड कप उंचावला आहे. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नरच्या अर्धशतकानंतर मिशेल मार्शने नाबाद 77 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कर्णधार केन विल्यमसनच्या 48 चेंडूतील 85 धावांच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने ऑस्ट्रेलियासमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

फिंचने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हेजलवूडने न्यूझीलंडला 28 धावांवर पहिला धक्का देत कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. डॅरेयल मिशेल 8 चेंडूत 11 धावा करुन माघारी फिरला. त्याच्यापाठोपाठ झम्पाने गप्टिलला 28 (35) माघारी धाडले. ही जोडी माघारी फिरल्यानंतर कर्णधार विल्यमसनने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने 10 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 48 चेंडूत 85 धावांची खेळी करत संघासाठी बहुमुल्य योगदान दिले. ग्लेन फिलिप्सच्या रुपात न्यूझीलंडला हेजलवूडने तिसरा धक्का दिला. त्याने 17 चेंडूत 18 धावांचे योगदान दिले. केन विल्यमसनची विकेटही हेजलवूडला मिळाली. नीशम आणि टिम सेफर्टने जोडीने निर्धारित 20 षटकात संघाची धावसंख्या 4 बाद 172 धावांपर्यंत पोहचवले.

पाहा सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

107-2 : स्फोटक वॉर्नरला बोल्टनं केल बोल्ड, त्याने 38 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 53 धावांची खेळी केली

वॉर्नर-मार्श जोडी जमली, दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 35 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली पूर्ण

15-1 : ऑस्ट्रेलियाच्या संघाला कर्णधार आरोन फिंचच्या रूपाने पहिला धक्का बसला. उंच मारलेल्या चेंडूवर 5 धावा काढून तो झेलबाद झाला.

------------------------------------------------------------------------------

INNINGS BREAK

------------------------------------------------------------------------------

148-4 : हेजलवूडच्या खात्यात आणखी एक यश, केन विल्यमसन 48 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 85 धावांची खेळी करुन फिरला माघारी

144-3 : ग्लेन फिलिप्सच्या रुपात न्यूझीलंडला तिसरा धक्का, त्याने 17 चेंडूत 18 धावांचे योगदान दिले

डावातील 16 व्या षटकात स्टार्कच्या गोलंदाजीवर विल्यमसन याने 22 धावा कुटल्या

कर्णधाराला साजेसा खेळ करत केन विल्यमसनने पूर्ण केलं अर्धशतक; स्पर्धेतील त्याची ही सर्वोच्च खेळी आहे.

76-2 : मार्टिन गप्टिल 35 चेंडूत 28 धावा करुन माघारी, झम्पाला मिळाले यश

10.4 : स्टार्कच्या गोलंदाजीवर हेजलवूडने सोडला केन विल्यमसनचा झेल, हा झेल ऑस्ट्रेलियाला चांगलाच महागात पडू शकतो

10 षटकानंतर न्यूझीलंड संघाने एका विकेटच्या मोबदल्यात 57 धावा केल्या आहेत. केन विल्यमसन 18 (19)* आणि डॅरेल मिशेल 27 (33)* मैदानात खेळत होते.

28-1 : डॅरेल मिशेलच्या 11 (8) रुपात न्यूझीलंडला पहिला धक्का. हेजलवूडच्या गोलंदाजीवर यष्टीमागे मॅथ्यू वेडनं टिपला झेल

मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर डॅरेल मिशेलने फायनल लढतीतील पहिला षटकार मारला

मार्टिन गप्टील आणि डॅरेल मिशेल जोडीनं न्यूझीलंडच्या तर मिशेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाकडून मारा करण्यास सुरुवात केली

असे आहेत दोन्ही संघ

New Zealand (Playing XI): मार्टिन गप्टील, केन विल्यमसन (कर्णधार) टीम सेफर्ट (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिशेल सँटनर, अ‍ॅडम मिल्ने, टीम साउदी, इश सोधी, ट्रेंट बोल्ट.

Australia (Playing XI): डेविड वॉर्नर, अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक). पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, अ‍ॅडम झम्पा, जोश हेजलवूड.

ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

loading image
go to top