PAK vs NAM : पाक विरुद्ध नामिबिया हरली, पण भारतापेक्षा भारी खेळली!

डेविड विजा याने 31 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने नाबाद 43 धावा करुन लक्षवेधी खेळ दाखवला.
PAK vs NAM
PAK vs NAMSakal
Updated on

Pakistan vs Namibia, 31st Match : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात नामिबियाने जिगरबाज खेळ दाखवला. पण त्यांना 45 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. अबुधाबाची मैदानात रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने पहिल्यांदा बॅटिंग करताना 189 धावा करत त्यांच्यासमोर 190 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना नामिबियाला निर्धारित 20 षटकात 5 बाद 144 धावांपर्यंत मजल मारता आली.

PAK vs NAM
Video : शाब्बास बाबर! पाक कर्णधाराची ICC नं थोपटली पाठ

हसन अली, इमाद वासीम, हरीस रौफ आणि शदाब खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. शाहीन आफ्रिदीला मात्र एकही विकेट मिळाली नाही. त्याच्या 4 षटकात सर्वाधिक 36 धावाही कुटल्या. नामिबियाकडून क्रॅग विल्यमसन याने 37 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 40 धावा केल्या. त्याच्याशिवाय डेविड विजा याने 31 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने नाबाद 43 धावा करुन लक्षवेधी खेळ दाखवला.

PAK vs NAM
बाबरनं किंग कोहलीला टाकले मागे; रचला आणखी एक विक्रम

नामिबियाने जिगरबाज खेळ दाखवला असला तरी 3 सामन्यातील 1 विजय आणि 2 पराभव यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पाकिस्तान संघाने दिलेल्या डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना नामिबियाची सुरुवात खराब झाली. धावफलकावर अवघ्या 8 धावा असताना मायकल वॅन 4 धावा करुन तंबूत परतला.

सलामीवीर स्टेफन बार्ड आणि क्रॅग विल्यमसन या जोडीनं पाकिस्तानी गोलंदाजांसमोर उभे राहण्याचे धाडस दाखवले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. स्टेफन 29 चेंडूत 29 धावा करुन बाद झाला. रिझवान-हॅरिस जोडीने त्याला धावबाद केले. आपल्या छोट्याखानी खेळीत त्याने 1 चौकार आणि 1 षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या कर्णधार गेरहार्डने 15 धावांची खेळी केली. क्रिग विल्यमसन 37 चेंडूत 40 धावा करुन तंबूत परतला. डेविड विजाने 31 चेंडूत 43 धावांची जबरदस्त खेळी करत संघाला 144 धावांपर्यंत पोहचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com