टीम इंडियाने 'नेट रन रेट' डोक्यात ठेवून स्कॉटलंडचा उडवला धुव्वा!

भारतीय संघाने 6.3 षटकात 8 विकेटसह विजय मिळवत गुणतालिकेत अफगाणिस्तानपेक्षा एक पाउल पुढे टाकले आहे.
IND vs SCO
IND vs SCO Twitter

India vs Scotland, 37th Match : स्कॉटलंडने दिलेल्या अल्प धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने नेट रन रेट उत्तम ठेवून सामना खिशात घातला. लवकरात लवकर आव्हान पार करत संघाला विजय मिळवून देण्यासाठी लोकेश राहुल आणि रोहित शर्मा जोडीनं डावाला सुरुवात केली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी रचली. पाचव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर व्हीलने रोहित शर्माला पायचित केले. त्याने 16 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 30 धावांचे योगदान दिले.

IND vs SCO
IND vs SCO: जसप्रीत बुमराहचा भेदक मारा; केला धडाकेबाज विक्रम

लोकेश राहुलच्या रुपात टीम इंडियाला दुसरा धक्का बसला. त्याने 17 व्या चेंडूवर षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. आपल्या 19 चेंडूतील खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार खेचले. विराट कोहली आणि सूर्यकुमारने टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. सूर्याने षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला. भारतीय संघाने 6.3 षटकात 8 विकेटसह विजय मिळवत गुणतालिकेत अफगाणिस्तानपेक्षा एक पाउल पुढे टाकले आहे.

IND vs SCO
Video : विल्यमसनचा कडक स्टेट ड्राइव्ह; बचावासाठी अंपायरची कसरत

विराट कोहलीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय सार्थ ठरवला. बुमराहने संघाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यापाठोपाठ अश्विन, जाडेजासह तळाच्या फलंदाजांना शमीने स्वस्तात माघारी धाडत स्कॉटलंडला अवघ्या 85 धावांत रोखले होते. सेमी फायनलमधील आशा पल्लवित ठेवण्यासाठी स्कॉटलंडने दिलेले आव्हान 43 चेंडूत पार करायचे होते. रोहित-लोकेश राहुलने या कॅलक्युलेशनसह फटकेबाजी केली. ही जोडी आपली जबाबदारी पार करुन तंबूत परतल्यानंतर विराट कोहली नाबाद 2 आणि सुर्यकुमारने दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com