नाचता येईना, अंगण वाकडे! टीम इंडियाच्या पराभवास खेळपट्टी कारणीभूत

सलग दोन पराभवामुळे भारतीय संघाला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उर्वरित सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकून इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.
 Ind vs Nz
Ind vs NzTwitter

युएईच्या मैदानात सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup 2021) भारतीय संघाची (India Cricket team) कामगिरी निराशजनक राहिली. सलामीच्या लढतीत पाकिस्‍तान (Pakistan Cricket team) आणि त्याच्या पाठोपाठ न्‍यूझीलंडने (New Zealand Cricket team) टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला. सलग दोन पराभवामुळे भारतीय संघाला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उर्वरित सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकून इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.

भारतीय संघाच्या पराभवाला जबाबदार कोण? अशा चर्चा रंगली असताना आता टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी खेळपट्टीला दोषी ठरवले आहे. दुबईच्या खेळपट्टीवर पहिल्यांदा बॅटिंग करण अवघड आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राठोड म्हणाले की, दुबईच्या खेळपट्टीवर पहिल्यांदा फलंदाजी करणं कठिण आहे. ज्या संघाने या खेळपट्टीवर पहिल्यांदा बॅटिंग केली तो संघ संघर्ष करताना दिसला. संघातील खेळाडू मोठे फटके खेळण्यात अपयशी ठरण्यामागे खेळपट्टी कारणीभूत आहे, असेही ते म्हणाले.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दुबईच्या मैदानावर जे दोन्ही सामने गमावले त्यात त्यांनी पहिल्यांदा फलंदाजी केली होती. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात 6-15 षटकांच्या दरम्यान एकही बाउंड्री मिळाली नव्हती. खेळपट्टीच्या परिस्थिती स्ट्राईक रोटेड करण्यात फलंदाज कुठेतरी कमी पडले, असे राठोड म्हणाले. संघर्ष केवळ आम्हीच नाही तर या खेळपट्टीवर खेळताना प्रत्येक संघ अडचणीत येताना दिसते, या गोष्टीवरही त्यांनी भर दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com