T20 WC : गत चॅम्पियन अखेर जिंकला, पूरन ठरला हिरो!

गेलला सलामीला संधी मिळाली. पण त्याला संधीच सोन करण्यात अपयश
West Indies vs Bangladesh
West Indies vs BangladeshT20 World Cup Twitter

West Indies vs Bangladesh, 23rd Match : निकोलस पूरनच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर दोन वेळच्या टी-20 वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडीजने अखेर विजयाचे खाते उघडली. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना वेस्ट इंडीजची सुरुवात खराब झाली. एविन लुईससोबत गेलला सलामीला संधी मिळाली. पण त्याला संधीच सोन करण्यात अपयश आले. लुईस 6 धावा करुन माघारी फिरल्यानंतर गेलही 4 धावा करुन तंबूत परतला.

रोस्टन चेस संघाचा डाव सावरत असताना दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत होत्या. यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनने 22 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 40 धावांची धमाकेदार खेळी करत संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. जेसन होल्डरने अखेरच्या टप्प्यात 5 चेंडूत 15 धावा कुटत सघाची धावसंख्या निर्धारित 20 षटकात 7 बाद 142 धावांपर्यंत पोहचली. अफगाणिस्तानकडून मेंहदी हसन, मुस्तफिझुर आणि शोरिफुल इस्लाम यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.

West Indies vs Bangladesh
Video: अजब गजब रन आऊट... रसल झाला हैराण; तुम्हीही एकदा पाहाच

या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवातही खराब झाली. बांगलादेशकडून मोहमम्द नईमच्या साथीनं शाकिब अल हसनने संघाच्या डावाला सुरुवात केली. रसेलनं अवघ्या 9 धावांवर हसनला तंबूत धाडले. जेसन होल्डरने नईमची महत्त्वपूर्ण विकेट घेत बांगलादेशला बॅकफूटवर ढकलले. लिटन दासने 43 चेंडूत 44 धावा करत संघाचा डाव सावरला. सोमय्य सरकार पुन्हा मोक्याच्या क्षणी योगदान देण्यात अपयशी ठरला. त्याने 17 धावा केल्या.

West Indies vs Bangladesh
पोलार्ड धाव पूर्ण करुन नॉन स्टॉप 'डग आउट'मध्ये पोहचला...

कर्णधार मोहम्ददुल्लाहने शेवटपर्यंत कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला पण बांगलादेशला विजय मिळवता आला नाही. बांगलादेशच्या कर्णधाराने 24 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 34 धावांची खेळी केली. ही खेळी संघाला विजय मिळवून देण्यात उपयुक्त ठरली नाही. वेस्ट इंडीजकडून रवि रामपाल, जेसन होल्डर, आंद्रे रसेल, अकेला हुसेन आणि ड्वेन ब्रावो यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com