T20 WC : पाकचं काही खरं नाही, झुंजारु गडी सेमी फायनलला मुकणार? |PAKvsAUS T20 WC Second SemiFinal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PAK
T20 WC : पाकचं काही खरं नाही, झुंजारु गडी सेमी फायनलला मुकणार?

T20 WC : पाकचं काही खरं नाही, झुंजारु गडी सेमी फायनलला मुकणार?

sakal_logo
By
सुशांत जाधव

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. स्पर्धेतील अपराजित पाकिस्तान संघाला या सेमीफायनलपूर्वी मोठा धक्का बसलाय. स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करत असलेला पाक संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि मध्यफळीतील अनुभवी खेळाडू असलेला शोएब मलिक (Shoaib Malik) दोघही आजारी असल्याचे वृत्त आहे.

दोन्ही खेळाडूंनी सराव सत्रात भाग घेतला नव्हता. या दोघांची कोरोना चाचणी झाली असून हा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पण त्यांच्या खेळण्याबाबत अद्याप कोणतीही गोष्ट स्पष्ट नाही. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानी संघाची फलंदाजी कमालीची राहिली आहे. यात मोहम्मद रिझवान आणि शोएब मलिक यांचीही फटकेबाजी पाहायला मिळाली. सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचे हे हुकमी एक्के खेळणार की त्यांच्याशिवाय पाकिस्तान मैदानात उतरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मोहम्मद रिझवानने 5 सामन्यात 214 धावा केल्या आहेत. टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यात त्याने मॅच विनिंग खेळी केली होती. याशिवाय स्कॉटलंड विरुद्ध शोएब मलिकने 18 चेंडूत 50 धावा करुन आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून दिली होती. जर हे दोन खेळाडू मैदानात उतरले नाहीत तर पाकिस्तानची डोकेदुखी वाढू शकते.

loading image
go to top