UAE मध्ये पाकिस्तान मुकुट नसलेला राजा; ऑस्ट्रेलियाविरुद्ध चुकता करणार हिशोब? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Cricket Team

पाकिस्तान ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११ वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता करणार?

दुबई : बुधवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला पराभूत करून अंतिम सामन्यात धडक दिली. न्यूझीलंड पहिल्यांदाच अंतिम सामना खेळणार आहे. गुरुवारी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळला जाईल. आज विजयी होणारा संघ न्यूझीलंडशी अंतिम सामना खेळेल. पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाला पराभूत करून ११ वर्षांपूर्वीचा बदला घेण्याची चांगली संधी आहे.

बाबर आझम याच्या नेतृत्वात खेळत असलेला पाकिस्तानचा संघ चांगली कामगिरी करीत आहे. विश्वचषकात अद्याप पाकिस्तान एकही सामना हरलेला नाही. असे असले तरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारा सामना त्यांच्यासाठी सोपी राहणार नाही. दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा संघ ११ वर्षे जुना ऑस्ट्रेलियाचा हिशोब चुकता करू इच्छितो. २०१० च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला होता.

हेही वाचा: एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचा खून

यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरिस रौफ यांनी विरोधी फलंदाजांना अडचणीत आणले असले तरी हसन अलीला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फिरकी विभागात इमाद वसीम, मोहम्मद हाफीज आणि शादाब खान हे कर्णधार बाबरचे प्रमुख शस्त्र असतील. फिरकीच्या विरोधात ऑस्ट्रेलियाला अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागला आहे.

यूएईमध्ये पाकिस्तानची चांगली कामगिरी

यूएईमध्ये पाकिस्तानचा संघ दबावाखाली चांगली कामगिरी करीत आहे. २००९ मध्ये श्रीलंकेच्या संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट फार काळ झाले नाही आणि देशाने आपले घरचे सामने यूएईमध्ये खेळले. पाकिस्तान सुपर लीगचे (पीएसएल) अनेक हंगामही येथे पार पडले. यामुळेच की काय यूएईमध्ये पाकिस्तानची चांगली कामगिरी सुरू आहे.

loading image
go to top