WI vs SL : श्रीलंकेची ‘दिवाळी’ तर वेस्ट इंडीजचा उडाला ‘धुव्वा’

shri lanka win
shri lanka winshri lanka win

अबू धाबी : वेस्ट इंडीजचा संघ १९० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. मात्र, बिनुरा फर्नांडो, चमिका करुणारत्ने व वानिंदू हसरंगा यांच्या घातक गोलंदाजीसमोर त्यांचे फलंदाज टिकू शकले नाही. निर्धारित २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १६९ धावाच काढू शकला. शिमरॉन हेटमायरची नाबाद ८१ धावांची खेळी वेस्ट गेली. तो संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. श्रीलंकेने हा सामना २० धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने चारिथ असलंकाचे ६८ व पथुम निस्संकाच्या ५१ धावांच्या जोरावर २० षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात १८९ धावांचा डोंगर उभारला होता.

तत्पूर्वी, वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत श्रीलंकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. श्रीलंकेच्या फलंदाजांनी वेस्ट इंडीजचा निर्णय चुकीचा ठरवत चांगली सुरुवात केली. सलामीचे फलंदाज पथुम निस्संका व कुसल परेरा यांनी ५.२ षटकांत ४२ धावा जोडल्या. दरम्यान, कुसल परेरा २९ धावा काढून बाद झाला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या चारिथ असलंका व पथुम निस्संका यांनी संघाला मोठी धावसंख्या मिळवून देण्यास सुरुवात केली.

चारिथ असलंका व कर्णधार दसुन शनाकाने जोरदार फटकेबाजी करीच करण्यास सुरुवात केली. मात्र, ६८ धावांवर असलेल्या चारिथ असलंकाला आंद्रे रसेल बाद केले. कर्णधार दसुन शनाकाने मोठे फडके हाणत नाबाद २५ धावा काढल्या. दोन अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकाने निर्धारित २० षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १८९ धावांचा डोंगर उभारला. वेस्ट इंडीजकडून आंद्रे रसेल दोन तर ड्वेन ब्राव्होने एक गडी बाद केला. अन्य गोलंदाजांना मात्र श्रीलंकेच्या खेळाडूंना बाद करता आले नाही.

shri lanka win
चंद्रशेखर बावनकुळे, अनिल बोंडे यांना घेतले ताब्यात; काळी दिवाळी

दोघांनी अगोदर पन्नास व नंतर शंभर धावा केल्या. दरम्यान, पथुम निस्संकाने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशकीय खेळी केल्यानंतर तो ५१ धावा काढून बाद झाला. १३३ धावांवर श्रीलंकेचा दुसरा गडी बाद झाला. यानंतर चारिथ असलंकाने आपले अर्धशतक पूर्ण केले. पाहता पाहता संघाची धावसंख्या १५० वर गेली.

१९० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडीजची सुरुवात चांगली राहली नाही. त्यांचे तीन फलंदाज संघाच्या ५० धावां पूर्ण होण्याआधीच बाद झाले. विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल फक्त एक धाव काढून बाद झाला. तर दुसरा सलामीचा फलंदाज एव्हिन लुईस ८ धावांवर बाद झाला. तर रोस्टन चेस हाही ९ धावा काढू शकला.

दुसरीकडे यष्टिरक्षक निकलस पूरनने संघाला सावरण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र, त्याला अन्य खेळाडूची साथ मिळाली नाही. तो ४६ धावा काढून बाद झाला. साघांची धावसंख्या शंभर होण्याआधीच वेस्ट इंडीजचा अर्धा संघ तंबूत परतला होता. यानंतर आंद्रे रसेल २ धावा काढून बाद झाला. कर्णधार किरॉन पोलार्डला खाते उघडता आले नाही.

जेसन होल्डर ८ धावा काढून बाद झाला. एका बाजूने शिमरॉन हेटमायरने लढा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. शिमरॉन हेटमायरची नाबाद ८१ धावांची खेळी वेस्ट गेली. दुसरीकडे श्रीलंकेच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडजच्या फलंदाजीची कंबर तोडली. बिनुरा फर्नांडो, चमिका करुणारत्ने व वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करीत संघाला विजय मिळवून दिला. दुष्मंथा चमीरा व दसुन शनाका यांनी वेस्ट इंडीजचे एक-एक फलंदाज बाद केले. वेस्ट इंडीजचा संघ निर्धारित २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १६९ धावाच काढू शकला. शिमरॉन हेटमायरची नाबाद ८१ धावांची खेळी वेस्ट गेली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com