Team India Stuck in Barbados : टीम इंडिया बार्बाडोसमध्ये 'लॉकडाऊन'! विमान उड्डाणे रद्द, लाईट अन् पाणीही गायब

टीम इंडियाने बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर टी-20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला होता. बार्बाडोसची भूमी केवळ टीम इंडियासाठीच नाही तर तिच्या प्रत्येक चाहत्यांसाठी खास बनली आहे, पण आता रोहित आणि कंपनी मोठ्या संकटात सापडली आहे.
Team India Stuck in Barbados
Team India Stuck in BarbadosSAKAL

टीम इंडियाने बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर टी-20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला होता. बार्बाडोसची भूमी केवळ टीम इंडियासाठीच नाही तर तिच्या प्रत्येक चाहत्यांसाठी खास बनली आहे, पण आता रोहित आणि कंपनी मोठ्या संकटात सापडली आहे.

खरंतर, टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली आहे आणि त्याचे कारण आहे वादळ. संपूर्ण बार्बाडोसला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू आपल्या आपल्या हॉटेलच्या खोलीत आहे.

बार्बाडोसमधील वादळामुळे वीज आणि पाण्याची व्यवस्थाही ठप्प झाली आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहे.

Team India Stuck in Barbados
Wimbledon 2024 : मेदवेदेव, अल्काराझची विजयी सलामी; विम्बल्डन ग्रँडस्लॅममध्ये मानांकित खेळाडूंची वाटचाल

टीम इंडिया कधी परतणार?

भारतीय संघ बार्बाडोसमध्ये अडकला असून तो कधी परतणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. केवळ खेळाडूच नाही तर बीसीसीआयचे सचिव जय शाह देखील बार्बाडोसमध्ये आहेत. रिपोर्ट्सनुसार, जय शाह टीम इंडियापूर्वी भारतात परतणार होते, पण बार्बाडोसमधील हवामान खराब झाल्यानंतर त्याने टीमसोबत राहण्याचा निर्णय घेतला.

Team India Stuck in Barbados
Suryakumar Yadav : 'मला माहित नाही काय झालंय...' ट्रॉफी जिंकल्यानंतर सूर्या हे काय म्हणाला, BCCIने शेअर केला 'तो' व्हिडिओ

वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेले अनेक परदेशी आणि भारतीय पत्रकारही बार्बाडोसमध्ये अडकले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारीही टीम इंडिया भारतात जाऊ शकणार नाही. सध्या टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू आपापल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे.

Team India Stuck in Barbados
'आता त्यांनी फक्त...', रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या भवितव्याबाबत जय शहा स्पष्टच बोलले

टी-20 वर्ल्ड कप कव्हर करणाऱ्या एका वरिष्ठ भारतीय पत्रकाराने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर बार्बाडोसच्या ताज्या हवामानाबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये समुद्रात उंचच उंच लाटा उसळताना दिसत आहेत. भारतीय प्रसारमाध्यमांनी आयोजित केलेल्या बार्बाडोसचे पंतप्रधान मिया अमोर मोटली यांच्याशी झालेल्या संभाषणात पुढील 12 तासात विमानतळावर उघडले जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com