U19 Cricket : क्रिकेट संघ की नेपोटिझमचा अड्डा...? 19 वर्षाखालील संघात आजी-माजी खेळाडूंच्या मुलांचा, पुतण्याचा समावेश

U19 Cricket : क्रिकेट संघ की नेपोटिझमचा अड्डा...? 19 वर्षाखालील संघात आजी-माजी खेळाडूंच्या मुलांचा, पुतण्याचा समावेश
Updated on

England U19 Test Team : इंग्लंडचे दिग्गज फलंदाज मायकेल वॉन आणि अँड्र्यू फ्लिंटॉफ यांनी कसोटी क्रिकेटमध्ये अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या कसोटी कारकिर्दीच्या १५ वर्षांनंतर, आता त्यांचे मुलगे आर्ची वॉन आणि रॉकी फ्लिंटॉफ यांनी इंग्लंडच्या अंडर-19 संघात स्थान मिळवले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसह ते आपल्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात करणार आहेत.

आर्ची वॉन आणि रॉकी फ्लिंटॉफ यांचा समावेश इंग्लंडच्या १४ जणांच्या संघात झाला आहे. वॉनचा मुलगा आर्चीने सॉमरसेट काउंटीच्या अकादमीमध्ये चमक दाखवली आहे, तर रॉकीने युवा वनडेमध्ये आपली छाप सोडली आहे.

U19 Cricket : क्रिकेट संघ की नेपोटिझमचा अड्डा...? 19 वर्षाखालील संघात आजी-माजी खेळाडूंच्या मुलांचा, पुतण्याचा समावेश
Virat Kohli: बघ, कसं वादळ आलंय..., जेव्हा विराट पत्नी अनुष्काला दाखवतो बार्बाडोसमधील वातावरण

या संघात कौटुंबिक संबंधांची एक अनोखी छटा पाहायला मिळते. इंग्लंडचा सध्याचा लेगस्पिनर रेहान अहमदचा भाऊ फरहान अहमद आणि माजी फलंदाज जो डेन्लीचा पुतण्या जेडेन डेन्ली यांनाही संघात स्थान मिळाले आहे.

आर्ची वॉनने आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यंग लायन्स इनव्हिटेशन इलेव्हनसाठी 83 चेंडूत 85 धावांची खेळी करून त्याने आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला. उजव्या हाताचा अष्टपैलू रॉकी फ्लिंटॉफने इंग्लंड U19 संघासाठी सर्वाधिक 106 धावा केल्या.

वॉन आणि फ्लिंटॉफ यांनी 1999 ते 2008 दरम्यान 48 कसोटी सामने एकत्र खेळले. आता त्यांच्या मुलांचा इंग्लंडच्या अंडर-19 संघात समावेश हा एक अभिमानास्पद क्षण आहे.

इंग्लंडचा अंडर-19 संघ श्रीलंकेविरुद्ध 8 ते 11 जुलै वर्म्सले येथे आणि 16 ते 19 जुलै चेल्तेनहॅम येथे दोन कसोटी सामने खेळणार आहे.

U19 Cricket : क्रिकेट संघ की नेपोटिझमचा अड्डा...? 19 वर्षाखालील संघात आजी-माजी खेळाडूंच्या मुलांचा, पुतण्याचा समावेश
Team India : टीम धोनीसारखीच रोहितच्या सेनेचीही जंगी परेड; जाणून घ्या क्रिकेटची पंढरी मुंबईत होणाऱ्या स्वागताचं संपूर्ण शेड्युल

इंग्लंड U19 संघ:

हमजा शेख (कर्णधार), फरहान अहमद, चार्ली ब्रँड, जॅक कार्ने, जेडेन डेन्ली, रॉकी फ्लिंटॉफ, केशा फोन्सेका, ॲलेक्स फ्रेंच, ॲलेक्स ग्रीन, एडी जॅक, फ्रेडी मॅककॅन, हॅरी मूर, नोआ थान आणि आर्ची वॉन.

Chitra kode:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.