
1983 World Cup Heroes wants to Help Vinod Kambli : नुकताच मुंबईतील छ. शिवाजी पार्क दादर येथे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा पार पडला. भारतरत्न सचिन तेंडूलकर याच्या हस्ते या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी आचरेकर सरांचे शिष्य व भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर, बलविंदर सिंग संधू, प्रविण आम्रे हे उपस्थित होते. आचरेकर सरांचा आणखी एक शिष्य व सचिनचा साथीदार विनोद कांबळीने देखील या क्रार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी एकेकाळच्या स्टार क्रिकेटपटूची सध्य परिस्थिती पाहून चाहत्यांची मने हळहळली. कार्यक्रमादरम्यान सचिनने आपल्या मित्राची भेट घेतली व त्याची विचारपुसही केली. दोघांच्या भेटीचा व्हिडीओ शोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.