
AFG vs AUS Champions Trophy 2025: चॅम्पियन्स क्रिकेट करंडकामधील अ गटातील उपांत्य फेरीचे दोन देश निश्चित झाले आहेत; मात्र ब गटातील एकही देश बाद फेरीत पोहोचलेला नाही. ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान यांच्यामध्ये आज (ता. २८) लाहोर येथे ब गटातील महत्त्वपूर्ण लढत रंगणार आहे. या लढतीत विजय मिळवणारा देश चॅम्पियन्स करंडकाच्या उपांत्य फेरीत पोहोचेल. इंग्लंडला पराभूत केल्यानंतर आता अफगाणिस्तानचा संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला धक्का देतो का, याचे उत्तर शुक्रवारी लाहोरमध्ये मिळेल.