Ind vs Eng Test Cricket : मालिका विजयाचे ध्येय ; भारतीय संघाने कंबर कसली

पहिल्या तीन सामन्यांच्या तुलनेत रांचीतील खेळपट्टी फिरकीस अधिक प्रमाणात साथ देणार, हे जवळपास निश्चित आहे. या संधीचा फायदा घेऊन भारतीय संघाने चौथ्या कसोटीसह इंग्लंडविरुद्धची ही कसोटी मालिका चौथ्या सामन्यात जिंकण्याचे ध्येय बाळगले आहे.
Ind vs Eng Test Cricket
Ind vs Eng Test Cricket sakal

रांची : पहिल्या तीन सामन्यांच्या तुलनेत रांचीतील खेळपट्टी फिरकीस अधिक प्रमाणात साथ देणार, हे जवळपास निश्चित आहे. या संधीचा फायदा घेऊन भारतीय संघाने चौथ्या कसोटीसह इंग्लंडविरुद्धची ही कसोटी मालिका चौथ्या सामन्यात जिंकण्याचे ध्येय बाळगले आहे. रोहित शर्मा तीन की चार फिरकी गोलंदाजांसह खेळणार का, याचीही उत्सुकता वाढली आहे.

पहिल्यांदा रोहित शर्मा चार फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरतो का, पहिल्या तीन सामन्यांप्रमाणे दोन वेगवान गोलंदाज संघात ठेवतो हे बघणे मजेचे असणार आहे. इंग्लंड कप्तान बेन स्टोक्स् अँडरसनला संघात जागा देऊन रॉबीन्सनला संधी देणार आहे. सामन्याच्या आदल्या दिवशी चर्चेचे केंद्रस्थान रांची मैदानावरची खेळपट्टी होती. खेळपट्टी जवळून बघितलेल्या प्रत्येकाने कोरड्या आणि फिरकीला साथ देणार्‍या खेळपट्टीचा अंदाज वर्तवला आहे.

Ind vs Eng Test Cricket
IPL 2024 Time Table : आयपीएलचे वेळापत्रक जाहीर ; पहिल्या १७ दिवसांत २१ सामन्‍यांचा रंगणार थरार

लागोपाठच्या दोन दौर्‍यात इंग्लंड संघाने पहिला कसोटी सामना जिंकून मग त्यामानाने कमजोर खेळ केला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना इंग्लंडने जिंकला तो ओली पोपच्या अफलातून भल्यामोठ्या शतकी खेळीमुळे. त्यानंतर कोणी इंग्लिश फलंदाज तशी खेळी करू शकला नाही, कारण पोपने जोखीम पत्करून खेळ केला तेव्हा त्याला नशिबानेही साथ दिली होती. पुढील तीन सामन्यात पोपसारखी फलंदाजी करायचे बाकीच्या फलंदाजांचे प्रयत्न फसले आहेत.

रांची सामन्यात जर खेळपट्टी खरेच पहिल्या दिवशीपासून फिरू लागली तर वाकडे तिकडे फटके खेळून राज्य गाजवायला नशिबाची अजून साथ लागणार आहे. इंग्लंड मात्र आपल्या चौथ्या कसोटीत फलंदाजी करताना आक्रमक वृत्तीचा पाठपुरावा करायला सज्ज झाला आहे. इंग्लंड संघाने रेहान अहमदची जागा ऑफ स्पीनर बशीरला दिली आहे. तसेच अँडरसनला संघात कायम ठेवले आहे.

जिमी एक लढवय्या खेळाडू आहे. वयाची चाळिशी पार करूनही त्याची तंदुरुस्ती आणि कठीण विकेटवर सामना खेळायची जिद्द कायम आहे. कोणा वेगवान गोलंदाजाला आदर्श ठेवायचा असे तर त्याने जिमी अँडरसनचा ठेवला पाहिजे इतका तो सामना खेळायला आणि लढत द्यायला सज्ज असतो, या शब्दात बेन स्टोक्स्‌ अँडरसनला मानवंदना दिली. जॉनी बेअरस्टोला गेल्या काही डावांत आलेले अपयश बऱ्याच लोकांना खटकले आहे. बेन स्टोक्स् त्याबद्दल बोलताना म्हणाला, फलंदाजाला काही डावात अपयश येते जे नॉर्मल आहे. कोणताच फलंदाज प्रत्येक सामन्यात धावा करून शकत नाही. जॉनी बेअरस्टो आक्रमक फलंदाज आहे आणि त्याने गेल्या दोन वर्षांत विविध संघांसमोर केलेली कामगिरी सगळ्यांना माहीत आहे, असा विश्वासही स्टोक्स्‌ याने व्यक्त केला.

खेळपट्टीबाबत अंदाज कठीण : स्टोक्स्‌

खेळपट्टीबाबत बोलताना स्टोक्स् म्हणाला, ड्रेसिंग रूममधून खेळपट्टीचा रंग वेगळा दिसला मला आणि प्रत्यक्ष जवळ गेल्यावर वेगळा. त्याचबरोबर एका बाजूला कोरडेपणा वेगळा आणि दुसऱ्या बाजूला वेगळा. मी अशी खेळपट्टी बघितली नाही, तेव्हा ती कशी खेळेल याचा अंदाज मी लावू शकत नाही.

प्रेक्षकांचा कमी उत्साह?

एकदिवसीय किंवा टी- २० सामन्याअगोदर रांची मैदानाबाहेर दिसणारी गर्दी कसोटी सामन्याच्या आदल्या दिवशी दिसली नाही. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी किती प्रेक्षक मैदानावर हजेरी लावतात याचा अंदाज संयोजकांनाही येत नाहीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com