
Andrew Flintoff 16 year old son Rocky Flintoff Scored Century : इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्य्रू फ्लिंटॉफच्या प्रमाणे आता मुलगा रॉकी फ्लिंटॉफ देखील दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. इंग्लंड लायन्स संघ सध्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मालिकेत अँड्य्रू फ्लिंटॉफ इंग्लंड लायन्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भुमिकेत आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मालिकेतील दुसऱ्या सामन्यात १६ वर्षीय रॉकी फ्लिंटॉफने शतकी कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघाविरूद्धच्या पहिल्या डावात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना फ्लिंटॉफने १०८ धावांची खेळी केली.