
Arjun Tendulkar Bowling Video Viral: एकीकडे काल इंटरनॅशनल प्रिमिअर लीगमध्ये डीवाय पाटील मैदानावर इंग्लंडविरूद्ध सचिन तेंडुलकरने उल्लेखनिय खेळी केली आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर आज डी वाय पाटील ट्वेंटी-२० कपमध्ये अर्जून तेंडुलकरने २ विकेट्स घेत ४ चेंडूत अवघ्या २३ धावा दिल्या. ज्यामध्ये एका फलंदाजाला त्याने यॉर्कर टाकत त्रिफळाचित केले व माघारी पाठवले ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
डीवाय पाटील ट्वेंटी-२० कपमध्ये डीवाय पाटील ब्ल्यू संघाकडून खेळताना अर्जून तेंडुलकरने संघाला सुरूवातीच्या दोन विकेट्स मिळवून दिल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंकम टॅक्स संघाला त्याने अवघ्या एका धावेवर माघारी पाठवले. सलामीवीर दिव्यांश सक्सेनाला त्याने बोल्ड करून माघारी पाठवले. अर्जूनने केलेला हा बोल्ड नेत्रदीपक होता.