
AUS vs ENG Champions Trophy 2025 ॲशेस मालिकेत एकमेकांसमोर उभे ठाकणारे दोन देश चॅम्पियन्स करंडकातील ब गटातील साखळी फेरीच्या लढतीत आमने-सामने येणार आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेत सुमार कामगिरी करणारा अन् सुमार फॉर्ममधून जाणारा इंग्लंडचा संघ दुखापतीमुळे प्रमुख खेळाडूंना मुकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाशी दोन हात करणार आहे.