
ब्रिस्बेन : भारतीय महिला क्रिकेट अ संघाला अखेरच्या एकदिवसीय लढतीत नऊ विकेट व १३३ चेंडू राखून पराभवाला सामोरे जावे लागले. यजमान ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट अ संघाने ही लढत जिंकत प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न केला. भारत महिला क्रिकेट अ संघाने अखेरचा सामना गमावला असला तरी एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने जिंकण्यात त्यांना यश आले.