IndiaA VS AustraliaA: चारदिवसीय लढतीत भारत अ संघाचा पराभव; यजमान ऑस्ट्रेलिया अ संघाची बाजी
Womens Cricket: भारत अ संघाने २८१ धावांचे लक्ष्य दिले असले तरी ऑस्ट्रेलिया अ संघाने सहा विकेट राखून विजय मिळवला. शेफाली वर्मा, राघवी बिस्त यांच्या चमकदार खेळी असूनही भारत अ संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
ब्रिस्बेन : टी-२० मालिका गमावल्यानंतर एकदिवसीय मालिका जिंकणाऱ्या भारत अ संघावर चारदिवसीय सामन्यात पराभवाची नामुष्की ओढवली. यजमान ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघावर सहा विकेट राखून मात केली.