Australia vs Sri Lanka: झिम्बाब्वेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियाची कसोटी, आज श्रीलंकेशी निर्णायक लढत

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचे टी-२० विश्वकरंडकातील अस्तित्व धोक्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्धचा उद्याचा सामना त्यांच्यासाठी करो या मरो ठरणार आहे.
Australia vs Sri Lanka

Australia vs Sri Lanka

sakal

Updated on

पाल्लेकेल : झिम्बाब्वेकडून धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत अस्तित्व पणास लागलेल्या माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचा आज सहयजमान श्रीलंकेशी सामना होत आहे. यातच खेळाडूंच्या दुखापतीचा फटका त्यांना बसत आहे, त्यामुळे अनुभवी स्टीव स्मिथचा समावेश उद्याच्या सामन्यात केला जाऊ शकतो. झिम्बाब्वेकडून ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव झाला. परिणामी, विश्वकरंडक स्पर्धेत ते गटातच बाहेर जाऊ शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com