
Australian Cricketer Announces Retirement: ऑस्टेलियाच्या वेगवान गोलंदाजने १६ वर्षांच्या कारकिर्दीनंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेटपटू जेसन बेहरेनडॉर्फने स्टेट क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. तो पश्चिम ऑस्ट्रेलिया संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळायचा. पण त्याने आता देशांतर्गत क्रिकेटमधून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. जेसन बेहरेनडॉर्फ २०२३ च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता.