
Axar Patel Catch Dropped : दुसऱ्या वन-डे सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी दमदार सुरूवात केली. सलामीवीर बेन डकेटचे स्फोटक रूप पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे फील सॉल्ट देखील त्याला चांगली साथ दिली. ११ वे षटक संपायला आले तरीही भारतीय संघाला विकेट मिळालेली नव्हती. पण सहाव्या षटकात ही संधी निर्माण झाली होती. फिल सॉल्टच्या रूपाने भारतीय संघाला पहिली विकेट मिळाली असती. पण अक्षर पटेलने सोपा झेल सोडला आणि सलामी जोडीने अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली. तर वरूण चक्रवर्थीने भारतासाठी व पहिली विकेट घेत वन-डे क्रिकेटमध्ये खातं उघडलं.