

Akshara Gupta triple century in one day cricket
esakal
Ayra Jadhav Creates History: भारतातील १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने( vaibhav sooryavanshi)आपल्या स्फोटक फलंदाजीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयपीएल(IPL) २०२६ मध्ये दमदार कामगिरी करत त्याने भारतीय टी-२० संघात स्थान मिळवले. आता बिहारच्या आणखी एका युवा क्रिकेटपटूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बिहारच्या युवा महिला फलंदाज अक्षरा गुप्ताने भागलपूर येथील संदिस कंपाऊंड मैदानावर सुरू झालेल्या बीसीए महिला १९ वर्षांखालील एकदिवसीय ट्रॉफी स्पर्धेत नाबाद ३०६ धावांची विक्रमी खेळी करत महिलांच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे.