
Babar Azam Father Gives Warning to Pakistani Cricketers: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत यजमान पाकिस्तानला एकही साखळी सामना जिंकता आला नाही. स्पर्धेतील खराब कामगिरीमुळे माजी कर्णधार बाबर आझम व कर्णधार मोहम्मद रिझवान यांना न्यूझीलंडविरूद्ध दौऱ्यात ट्वेंटी-२० संघातून वगळण्यात आले आहे. स्पर्धेतील अपयशामुळे माजी क्रिकेटपटूंमार्फत संघावर, माजी कर्णधारावर व कर्णधारावर प्रचंड टीका करण्यात आली. पण बाबर आझमच्या वडिलांनी त्याच्या समर्थनार्थ पोस्ट करत माजी क्रिकेटपटूंना इशारा दिला आहे.