
Babar Azam out after Hassan Ali Tweet : पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने आज विक्रमी कामगिरी केली. त्याने स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचा विक्रम मोडाला. बाबर सर्वाधिक जलद ६००० वन-डे धावा करणारा खेळाडू ठरला. यावेळी त्याने आफ्रिकन क्रिकेटपटू हाशिम आमलाच्या विक्रमाची बरोबरी केली. बाबर आझम आज चांगल्या लयमध्ये दिसत होता. त्याने चौकार मारत ६००० वन-डे धावांचा टप्पा गाठला. पण पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अलीने 'बाबर आज शतक ठोकेल' असे ट्वीट केले अन् बाबर स्वस्तात बाद झाला.