BCCI Central Contracts : BCCI खेळाडूंची कशी करते निवड, A+, A, B, C कराराचा विषय आहे तरी काय?

Know How does BCCI select players? अखेर ज्याचा अंदाज बांधला जात होता ते घडले, काल रात्री भारतीय क्रिकेट बोर्डाने वार्षिक करार जाहीर केला ज्यामध्ये....
BCCI Central Contract Marathi News
BCCI Central Contract Marathi Newssakal

BCCI Central Contracts : अखेर ज्याचा अंदाज बांधला जात होता ते घडले, काल रात्री भारतीय क्रिकेट बोर्डाने वार्षिक करार जाहीर केला. ज्यामध्ये इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांची नावे दिसत नाही. हे दोन्ही खेळाडू गेल्या वर्षी कराराचा भाग होते. मात्र यावेळी संघ व्यवस्थापनाच्या नाराजीमुळे त्यांचा करार रद्द करण्यात आला आहे.

यावेळी जवळपास एकूण 30 खेळाडूंना चार श्रेणींमध्ये करार मिळाला आहे. आणि बीसीसीआयने पाचवी विशेष श्रेणी देखील तयार केली आहे, ज्यामध्ये फक्त वेगवान गोलंदाजांना स्थान मिळाले आहे. या यादीत पाच फक्त युवा वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.

पण तुम्हाला कधी एक प्रश्न पडला नाही का? BCCI कोणत्या आधारावर A+, A, B, C सारख्या श्रेणींमध्ये खेळाडूंची निवड केली जाते आणि त्यांना किती पैसे मिळतात.

BCCI Central Contract Marathi News
BCCI Central Contract : करारात नाही तरी... सर्फराज खान अन् ध्रुव जुरेल होणार मालामाल! BCCIने बनवला खास नियम

BCCI खेळाडूंची कशी करते निवड?

भविष्यातील योजना, खेळाडूंची कामगिरी आणि फॉर्म हे सगळं लक्षात घेऊन बीसीसीआय केंद्रीय करारत कोणत्या खेळाडूला कोणत्या श्रेणीमध्ये टाकायचं हे ठरवते.

यावेळी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांना A+ श्रेणीत कायम ठेवण्यात आले. यांच्या व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा हे देखील A+ श्रेणीत आहेत.

कोणत्या श्रेणीतील खेळाडूला किती रुपये मिळतात?

A+ श्रेणीतील खेळाडूंना 7-7 कोटी रुपये, A श्रेणीतील खेळाडूंना 5-5 कोटी रुपये, B श्रेणीतील खेळाडूंना 3-3 कोटी रुपये आणि C श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 1-1 कोटी रुपये मिळतील.

BCCI Central Contract Marathi News
BCCI Central Contract : अय्यरला वगळले, हार्दिकला गोंजरले; पांड्याला न खेळता मिळाला वार्षिक करार... BCCIने केला अन्याय?
  • ग्रेड A : रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या.

    - अ श्रेणीतील या सहा खेळाडूंना 5 कोटी मिळतील.

  • ग्रेड ब : सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.

    - ब श्रेणीतील या खेळाडूंना तीन कोटी मिळतील.

  • ग्रेड सी : रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्‍नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेशकुमार, संजू सॅमसन, अर्शदीप, के. एस. भारत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, रजत पाटीदार.

    - या श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला एक कोटी रुपये मिळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com