Indian Cricket : BCCI मोठ्या बदलाच्या तयारीत, 'या' स्पर्धेत नाही होणार आता नाणेफेक?

Jay Shah proposes to eliminate toss, longer gap between domestic matches
Jay Shah proposes to eliminate toss, longer gap between domestic matchessakal

बीसीसीआय यंदा रणजी करंडक दोन भागांमध्ये विभागण्याचा विचार करत आहे, त्यानुसार 2024-25 च्या मोसमातील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (T20) आणि विजय हजारे ट्रॉफी (50 षटके) या व्हाईट बॉल टूर्नामेंटच्या आधी आणि त्यानंतर या स्पर्धेचे आयोजन केले जाईल.

2024-25 हंगामासाठी देशांतर्गत क्रिकेट कॅलेंडरची पुनर्रचना करण्याचा मसुदा प्रस्ताव सर्वोच्च परिषदेकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. ज्यामध्ये कर्नल सीके नायडू ट्रॉफीमधून नाणेफेक काढून घेण्याबाबतही चर्चा आहे.

Jay Shah proposes to eliminate toss, longer gap between domestic matches
KKR vs MI Score IPL 2024 : कोलकता प्लेऑफसाठी पात्र! हेलखावे खाणाऱ्या मुंबई इंडियन्सचा आणखी एक पराभव

रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यात घेण्याचा विचार

बीसीसीआयचे सचिव जय शाह, भारतीय कर्णधार रोहित शर्मा, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा प्रस्ताव देण्यात आला आहे.

रणजी ट्रॉफीच्या नवीन प्रस्तावित स्वरूपानुसार, पाच लीग टप्यांमध्ये पांढऱ्या चेंडूच्या स्पर्धा (सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी) होतील. उर्वरित दोन रणजी लीग सामने आणि बाद फेरीचे सामने मर्यादित षटकांच्या स्पर्धेनंतर होणार आहेत.

हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये देशाच्या उत्तरेकडील भागात खराब हवामानामुळे उद्भवलेल्या आव्हानांना तोंड देणे तसेच सामन्यांमधील दीर्घ अंतर सुनिश्चित करणे हा हेतू आहे. गेल्या मोसमातील रणजी ट्रॉफीमध्ये दोन सामन्यांमध्ये केवळ तीन दिवसांचे अंतर होते, हेही बीसीसीआयने लक्षात घेतले आहे. यात प्रवासही होता, ज्यामुळे खेळाडूंना विश्रांती आणि ताजेतवाने होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता.

Jay Shah proposes to eliminate toss, longer gap between domestic matches
Novak Djokovic : रोम ओपनदरम्यान चाहत्याला स्वाक्षरी देताना जोकोविचसोबत घडला विचित्र प्रकार

जय शहा यांनी केले हे वक्तव्य

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, कर्नल सीके नायडू ट्रॉफी सामन्यांसाठी नाणेफेक काढली जाईल. त्याऐवजी, पाहुण्या संघाला फलंदाजी की गोलंदाजी निवडण्याचा अधिकार असेल. त्यांनी 23 वर्षांखालील रेड बॉल स्पर्धेसाठी नवीन पॉइंट सिस्टम सुचवले. यामध्ये पहिल्या डावातील फलंदाजी आणि गोलंदाजीतील गुणांचा समावेश आहे.

याशिवाय पहिल्या डावातील आघाडी किंवा विजयासाठीचे गुणही समाविष्ट आहेत. सीके नायडू ट्रॉफीसाठी तयार करण्यात आलेल्या पॉइंट सिस्टिमचा बोर्ड हंगामाच्या शेवटी पुनरावलोकन करेल आणि त्यानंतर रणजी ट्रॉफीच्या आगामी हंगामात ती लागू करता येईल का याचा निर्णय घेईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com