

BCCI to review Team India after England tour
esakal
BCCI to review Team India after England tour: भारतीय क्रिकेट संघासाठी इंग्लंड दौरा विसरण्यासारखा ठरत आहे. ब्रिस्टलमध्ये झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने भारताचा ९ विकेट्सने धुव्वा उडवत पाच सामन्यांची मालिका ३-० अशी आपल्या नावावर केली.
याआधी आयर्लंड विरुद्धही श्रेयस अय्यरच्या(Shreyas Iyer) नेतृत्वाखाली भारताला मालिका गमवावी लागली होती. त्यामुळे आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टीम मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.