
PAK vs NZ Champions Trophy 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील उद्घाटन सामना यजमान पाकिस्तान व न्यूझीलंड संघांदरम्यान रंगणार आहे. ८ वर्षांनंतर होणाऱ्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्याचा नाणेफेक पाकिस्तानने जिंकला असून कराची मैदानावर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आता घरच्या मैदानावर पाकिस्तान संघ विजयी सुरूवात करणार की तिरंगी मालिकेत भारी पडलले ब्लॅक कॅप्स पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभावाची धूळ चारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.