
Team India For Champions Trophy 2025: पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. १२ जानेवारी ही या स्पर्धेसाठी प्राथमिक संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख होती. स्पर्धेत सहभागी झालेल्या ८ देशांपैकी ६ देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. परंतु अद्यापही भारत व पाकिस्तान या दोन देशांनी आपले संघ जाहीर केलेले नाहीत. अशातच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणारा भारताचा संघ कसा असेल? हे माजी क्रिकेटपटू व समालोचक सुनिल गावस्कर व इरफान पठाण यांनी सांगितले आहे.