

Champions Trophy 2025 full schedule and venues in Pakistan
दुबई/कराची, ता. १८ इंग्लंडमध्ये २०१७ मध्ये चम्पियन्स करंडकाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता तब्बल आठ वर्षांनंतर ही प्रतिष्ठेची स्पर्धा पाकिस्तानात खेळवण्यात येत आहे. पाकिस्तानात अखेरचो आयसीसी स्पर्धा १९९६ मध्ये पार पाहली होती. त्या वेळी पाकिस्तानसह भारत व श्रीलंका येथे एकदिवसीय विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल २९ वर्षांनंतर पाकिस्तानात आयसीसी स्पर्धेची रंगत पाहायला मिळणार आहे.